Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गौण खनिज आणि वाळू उपशावर राजकारण सुरू; दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राजकारणाची नवी पद्धत रूढ
राजकारण

गौण खनिज आणि वाळू उपशावर राजकारण सुरू; दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राजकारणाची नवी पद्धत रूढ

नव्या सरकारला जिल्ह्याचा एवढा राग का : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर

गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली नगर जिल्ह्यात राजकारण सुरू असून दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. मंजूर झालेली विकास कामे काही मंडळींच्या व्यक्तिगत हट्टापायी थांबविली जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला अहमदनगर जिल्ह्याचा एवढा राग का आहे असा प्रश्न उपस्थित करत थोरात म्हणाले, सत्तेत असूनही जिल्ह्याच्या हिताच्या आड येणारी ही मंडळी जिल्ह्याचे खरे विरोधक आहे. नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू होती, आज ही विकास कामे ठप्प आहेत. नव्या सरकारने जुन्या सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांना स्थगिती दिली आहे. तर काही मंडळींनी त्याही पुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकास कामांना स्थगिती दिली.

महाविकास आघाडी सरकारने अगदी कोरोना काळातही राज्याच्या विकासाला गतिमान ठेवले होते. जनसामान्यांचे हित लक्षात घेत अनेक प्रकल्प आणि योजनांना मंजुरी दिली होती. वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली राजकीय कारवाया केल्या जात आहे. कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड, खोटे गुन्हे दाखल करून उद्योग व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. या बेकायदेशीर कारवाईमुळे घरे, रस्ते आणि सरकारी विकास कामे सुद्धा बंद पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून अनेक कामगारांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे.

उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणारा निळवंडे प्रकल्प देखील यामुळे रखडला आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला गती दिली होती. अनेक वर्षापासून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी संघर्ष सुरू आहे. मात्र हा प्रकल्प रखडविण्यासाठी आणि दुष्काळी भागाला पाणी मिळू नये, यासाठी तर हे षडयंत्र नाही ना अशी देखील शंका निर्माण होते.

नगर जिल्हा समृद्ध राजकीय परंपरा असलेला जिल्हा आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कारवाया या येथील परंपरेला छेद देणारे आहे राजकारणाच्या नादात संपूर्ण जिल्हाच काही मंडळींनी वेठीस धरला असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री थोरात यांनी केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 102
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.