Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालघर पोलिसांनी पकडलेल्या संगमनेरमधील तिघा आरोपींकडे आढळले परदेशी बनावटीचे पिस्टल
गुन्हेगारी

पालघर पोलिसांनी पकडलेल्या संगमनेरमधील तिघा आरोपींकडे आढळले परदेशी बनावटीचे पिस्टल

गेल्या आठवड्यात पालघरच्या तलासरी पोलिसांनी केली होती कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/12/2022Updated:07/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या तपासणी नाक्यावर पालघरच्या तलासरी पोलिसांनी मेड इन युएसए असा शिक्का असलेले परदेशी मार्क असलेले पिस्टल आणि काडतुसे घेऊन फिरणाऱ्या संगमनेर मधील तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी पिकअप जीप, पिस्टल आणि काडतुसे असा आठ लाख वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इरफान युनुस शेख (वय- २५ वर्षे, धंदा-व्यापार, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमदनगर), मुसा हारुण शेख (वय- २८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमदनगर), समित लाजरस खरात (वय ३० वर्षे, व्यवसाय चालक, रा. कुरण रोड, महादेव वस्ती ता. संगमनेर जि. अहमदनगर) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तलासरी पोलिसांनी गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर उधवा कोदाड रस्त्यावर नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान उधवा कोदाड रस्त्यावर दळवी पाडा येथे पोलिसांनी पिकअप जीप क्र. एम.एच ४१ जी ३२७३ अडविली असता पिकअप जीप मधील तिघांनी आपण गुजरातला जात असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांचा संशय बळवल्याने त्यांनी पिकअपची तपासणी केली असता त्यांना एका प्लास्टिक पिशवीमध्ये एक पिस्टल आणि काडतुसे आढळून आली.

MADE IN U.S.A मार्क असलेले एक पिस्टल (कट्टा) तिस पकडण्याच्या ठिकाणी दोन्ही बाहेरील बाजुला लाकडी प्लेट स्क्रू ने फिट केलेल्या असून सदरचे पिस्टल सुमारे ६ सेमी लांबीचे व सुमारे साडेचार इच रुंदीचे आहे. तसेच k.f 7.65 मार्क असलेले पिस्टल (कट्टा ) चे जिवंत दोन राऊंड मिळून आले. पोलिसांनी पिकअपसह आरोपी जवळ आढळलेली शस्त्र जप्त केली असून आरोपींना अटक केली. यासंदर्भात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र दुंदु सातवी यांनी फिर्याद दिली असून तलासरी पोलीस ठाण्यात ३८६/२०२२ भादवि कलम ३४ सह, भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे हे करत आहेत.

दरम्यान तीनही आरोपी संगमनेर तालुक्यातील असल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संगमनेरच्या बजरंग दलाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून सदर आरोपी हे गोवंश हत्या व गोवंश मांस तस्करी करणारे आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. याची सखोल चौकशी झाली तर संगमनेर तालुक्यातील कुरण या ठिकाणी अवैध शस्त्रे सापडण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसे निवेदन बजरंग दलाचे नगर विभाग संयोजक सचिन कानकाटे व साहेबराव वलवे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 317
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.