Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकरावीमध्ये शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना एक वर्ष आधीच जातवैधता प्रमाणपत्र
प्रशासन

अकरावीमध्ये शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना एक वर्ष आधीच जातवैधता प्रमाणपत्र

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

ऐरवी जातवैधता प्रमाणपत्र बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते.‌ मात्र नगरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याही पुढे जात अकरावीमध्ये शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा नावीन्यपूर्ण, स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. एक वर्षाआधी, ते पण एका दिवसातच हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का बसला.

अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती त्यांच्या लोकाभिमुख व जलद कामकाजामुळे राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. सेवा पंधरवड्यात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप करून समिती राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन भाषणात जिल्हा समितीच्या कामकाजाचे कौतूक केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ची राज्यात प्रथम अंमलबजावणी व पासपोर्टच्या धर्तीवर जातवैधता वाटप करणारी राज्यातील पहिली समिती अहमदनगर जिल्हा समिती ठरली. जिल्हा समितीच्या या विविध उपक्रमात आता एका वर्षाआधीच प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची भर पडली आहे.

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाथर्डीमधील श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जातवैधता प्रमाणपत्र’ वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी समितीच्या सदस्या तथा उपायुक्त आमिना शेख , सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भाऊ खरे, व्यवस्थापक प्रविण बेळगे, प्राचार्य अशोक दौंड, विभागप्रमुख सुधाकर सातपुते आदी उपस्थित होते. 

या शिबिरासाठी तिलोक जैन महाविद्यालयांने त्यांच्या व तालुक्यातील इतर महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे १ डिसेंबर २०२२ पूर्वी २७३ प्रस्ताव जमा करून घेतले होते. या सर्व प्रस्तांवाची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एकदिवसीय शिबिरात छाननी करून २४७ विद्यार्थ्यांना जागेवरच जात वैधता प्रमाणपत्रांची वाटप केले.

‘‘इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना एक वर्षाआधी प्रमाणपत्र देवू शकलो याचे समाधान आहे. जिल्हा समितीच्या या उपक्रमाची ‘पाथर्डी पॅटर्न’ म्हणून राज्य पातळीवर नोंद घेतली जाईल. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मोठ्या महाविद्यालयांनी श्री तिलोक जैन महाविद्यालयाचा आदर्श घेऊन तालुक्यात एकाच ठिकाणी शिबिराच्या आयोजनात पुढाकार घ्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्र प्राप्त होऊन त्यांचा वेळ व श्रम वाचेल.’’

विकास पानसरे, समिती अध्यक्ष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 191
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.