Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पठार भागातील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची केली सुटका
गुन्हेगारी

पठार भागातील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची केली सुटका

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
संग्रहित छायाचित्र
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मोठ्या शहरातील वेश्याव्यवसायाचे लोन संगमनेरच्या ग्रामीण भागात पोहोचले आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन पीडित मुलींची सुटका केली. ग्रामीण भागात पोलिसांनी केलेल्या कारवांमुळे खळबळ उडाली आहे.

लॉजेससह अन्य काही ठिकाणी चालणारे अनैतिक धंदे सर्वश्रुत असले तरी ग्रामीण भागातही आता अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले.

नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटालगत पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीराम पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानंतर मिटके यांनी आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले होते. गुरुवारी पहाटेच्या वेळी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी बनावट ग्राहकाला पाठविले. या ग्राहकाच्या आधारे संबंधित ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकला. कारवाईत पथकाने एका महिलेला ताब्यात घेत दोन परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली आहे.

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलमान्वये या पीडित मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात आणि संगमनेर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस नाईक मनोज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, महिला पोलीस कॉन्स्टेबल मंगल जाधव यांनी केल्याची माहिती मिळाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 172
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.