Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने मंत्री चंद्रकांत पाटलांचा केला निषेध
राजकारण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने मंत्री चंद्रकांत पाटलांचा केला निषेध

संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना दिले निवेदन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/12/2022Updated:15/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने मंगळवारी संगमनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन देत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदविला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राजकीय फायद्यासाठी महापुरुषांविषयी बेताल आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल कोणीही उठतो आणि स्वतःच्या अर्धवट इतिहासाच्या माहितीवर आधारित वाटेल तशी क्रिया, प्रतिक्रिया, वक्तव्य, विधाने महापुरुषांबद्दल करत असतो.

खरंतर आज पर्यंत असं बोलण्याची कोणाचीही मिजास नव्हती. परंतु आता मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांना वारंवार टार्गेट केले जात आहे. थोर महापुरुषांचा वारंवार अपमान या राज्यात केला जातोय. महापुरुषांचा अवमान, अपमान करणाऱ्या अशा नेत्यांना व राजकारण्यांना रोखले का जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बेताल वक्तव्य करणाऱ्या अशा नेत्यांमुळे राज्यात सातत्याने असंतोष निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा विभूतींच्या राज्यात राहून त्यांचाच अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.

आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अमोल निकम यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर कार्याध्यक्ष विजू खरात, युवक तालुकाध्यक्ष योगेश मंतोडे, तालुका संघटक मधुकर सोनवणे, उपशहर प्रमुख शहाणू बेगमपुरे आदींच्या सह्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 135
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.