Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गाव कारभारी ठरविण्यासाठी संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू
राजकारण

गाव कारभारी ठरविण्यासाठी संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू

दोघा सरपंचांसह ७३ सदस्यांच्या बिनविरोध निवडी; अन्य ठिकाणची मंगळवारी मतमोजणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर तालुक्यातील ३७ गावांचे गाव कारभारी ठरविण्यासाठी या गावांमध्ये रविवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घुलेवाडी, साकुर, जोर्वे या तुलनेने मोठ्या आणि संवेदनशील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली असून शनिवारी रात्रीच निवडणूक कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले. रविवारी सकाळीच मतदानास सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

रविवारी सकाळीच राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कुटुंबीयांसह जोर्वे येथे मतदान केले.

निवडणुकीमुळे मतदान होत असलेल्या आणि त्या आजूबाजूच्या गावातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. या वेळी पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच निवडीला अधिक महत्त्व आले, त्यातूनच गावोगाव मोठी चुरस निर्माण झाली आहे. बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ता आहे, असे असले तरी अनेक ठिकाणी थोरात यांचे नेतृत्व मानणारे दोन गट नेहमीप्रमाणे समोरासमोर उभे ठाकले आहेत.

पूर्वेकडची काही गावे संगमनेर तालुक्यात असली तरी विधानसभेसाठी राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे तिथे थोरात आणि विखे यांच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झालेला पाहायला मिळतो.

निवडणुका होत असलेल्या तालुक्यातील घुलेवाडी, साकुर, धांदरफळ बुद्रुक, तळेगाव दिघे या मोठ्या आणि तुलनेने संवेदनशील ग्रामपंचायती मानण्यात येतात. इथल्या निवडणुकीत नेहमीच मोठी चुरस दिसून आलेली आहे. त्यातून अनेकदा वादावादीचे प्रकारही होतात. तळेगाव दिघे येथे तर निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला होता. त्यातून काही दिवस तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळेच प्रशासनाचे या गावांवर बारीक लक्ष आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासह सरपंच पदासाठी निवडणूक होत असलेल्या ३७ पैकी सायखिंडी व डोळासने येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या प्रभागात ७३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ३५ ठिकाणी सरपंच पदासह २९४ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी एकूण १५८ मतदान केंद्र असून तेवढेच मतदान केंद्राध्यक्ष, ३१६ मतदान अधिकारी असे साधारण ८०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी शनिवारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले असून आज रविवारी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन ही निवडणूक प्रक्रिया हाताळत आहे.

मंगळवारी निवडणूक झालेल्या सर्व गावांची एकत्रित मतमोजणी सकाळी दहा वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. जस-जसे निवडणूक निकाल जाहीर होतील तसतसे त्या-त्या गावचे गाव कारभारी देखील निश्चित होतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 174
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.