Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चार हजाराची लाच मागणी करणाऱ्या ‘या’ मॅडम विरोधात अँटी करप्शन विभागाने केला गुन्हा दाखल
गुन्हेगारी

चार हजाराची लाच मागणी करणाऱ्या ‘या’ मॅडम विरोधात अँटी करप्शन विभागाने केला गुन्हा दाखल

जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मागितली होती लाच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर : व्यवसायासाठी काढण्यात आलेला जीएसटी नंबर फाईल न केल्यामुळे रद्द करण्यात आला होता. तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महिला राज्यकर अधिकाऱ्याविरोधात अँटी करप्शन विभागाने नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सारिका जयवंत निकम (वय 39 वर्ष) असे लाचेची मागणी करणाऱ्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) विभागाच्या आरोपी महिला राज्य कर अधिकाऱ्याचे नाव आहे. निकम यांनी मोहरी तालुका पाथर्डी येथील तक्रारदाराच्या जुलै 2022 मध्ये जीएसटी नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे रद्द केला होता. व्यवसायासाठी असलेला जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी निकम यांनी 17 ऑक्टोबरला तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने अहमदनगरच्या अँटी करप्शन विभागाशी संपर्क करा महिला अधिकारी निकम यांच्या विरोधात तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी महिला अधिकारी निकम यांनी चार हजार रुपये लाच म्हणून घेण्याचे मान्य केले होते. त्यामुळे महिला आरोपी निकम यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिल्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, नगर अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलीस नाईक रमेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या मस्के, चालक तागड आदींचा पथकामध्ये समावेश होता.

आवाहन

कोणीही लोकसेवक सामान्य जनतेला त्यांचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याशी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ०२४१-२४२३६७७ या दूरध्वनी क्रमांक वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 148
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.