Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सेवानिवृत्तीच्या तोंडावर महिला नायब तहसीलदार कोतवालासह अँटी करप्शनच्या जाळ्यात
गुन्हेगारी

सेवानिवृत्तीच्या तोंडावर महिला नायब तहसीलदार कोतवालासह अँटी करप्शनच्या जाळ्यात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

निफाड : सेवानिवृत्तीस पाच महिन्यांचा कालावधी राहिला असताना महिला नायब तहसीलदार कल्पना शशिकांत निकुंभ यांच्यासह त्यांचा साथीदार कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे.

तक्रारदाराची पिंपळगाव नजीक असलेली शेत जमीन बिनशेती करण्यासाठी प्रलंबित असलेल्या कामकाजाबाबत निफाड तहसील कार्यालयात प्रलंबित असलेल्या फाईलवरील कार्यालयीन टिप्पणीवर सही करून ते प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यासाठी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्याने यासंदर्भात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री केली असता तडजोडीअंती पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले.

त्यानुसार बुधवारी दुपारी चार वाजता लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा लावला होता. दरम्यान नायब तहसीलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून प्रशासकीय इमारतीच्या पुरुष प्रसाधनगृहामध्ये लाचेची पस्तीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारणाऱ्या कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे याला रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, अजय गरुड, किरण अहिरराव, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचखोर नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांचा सेवनिवृत्तीचा काळ पाच महिन्यावर आला असतांना त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 133
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.