Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना शाखाप्रमुखाला अज्ञाताने दिले जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र
गुन्हेगारी

शिवसेना शाखाप्रमुखाला अज्ञाताने दिले जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र

यापूर्वी मिळाला होता ...नाहीतर बेत पाहण्याचा व्हाट्सअप मेसेज
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील मुस्लिम मावळा म्हणून गौरविलेल्या संगमनेरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाप्रमुखाला अज्ञात व्यक्तीने दिलेल्या एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 507 नुसार नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना शाखाप्रमुख अजित याकूब मोमीन यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अज्ञात इसमाने मोमीनपुरा येथील घरी एक पत्र आणून दिले असल्याची माहिती मोमीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोबाईलवर दिली. फिर्यादी मोमीन यांनी सदरचे पत्र बघितले असता त्याचे पाकीट फोडलेल्या अवस्थेत होते. तसेच आतील पत्रावर मोमीन यांना जीवे मारण्यासंदर्भातील मजकूर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी मोमीन यांच्या मोबाईल व्हाट्सअपवर अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर जास्त उड्या मारू नको, 50 खोक्यांच्या मुद्द्यावर बोलायचा तुझा काही एक संबंध नाही. नाहीतर तुझा बेत पाहू, अशा आशयाची धमकी दिली होती. त्या पाठोपाठ दुसऱ्यांदा पत्राद्वारे मोमीन यांना धमकी आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मोमीन यांना मिळालेल्या धमकीच्या आधारे पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. राज्यात शिवसेनेतील बंडानंतर मुस्लिम मावळा म्हणून मोमीन चर्चेत आले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात देखील ते अग्रभागी होते. शिवसेना शाखाप्रमुख म्हणून प्रभागातील रस्त्याच्या कामासंदर्भात त्यांनी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या समवेत पालिका प्रशासनाशी संघर्ष करत रस्त्याचे काम मार्गी लावण्यास हातभार लावला होता. अल्पावधीतच त्यांनी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षात स्थान मिळविले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 123
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.