Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यामध्ये हाणामारी; चाँपरने केलेल्या मारहाणीत एक जण जखमी
गुन्हेगारी

रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यामध्ये हाणामारी; चाँपरने केलेल्या मारहाणीत एक जण जखमी

मारहाण करणाऱ्या १०-११ जणांविरोधात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : रस्त्यावर दुकान टाकून बॅग विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची परिणती थेट चाँपरचा वापर करत हल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली. यात एक जण जखमी झाल्याने शहर पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उमेर मेहबूब पारवे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनील धात्रक, सागर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात जखमी युवकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

बुधवारी सायंकाळी फिर्यादीचा मुलगा आणि आरोपींमध्ये बॅग विकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. फिर्यादीचा मुलगा व त्याचे मित्र रात्री जवळच्याच महेश नागरी पतसंस्थेसमोर गप्पा मारत असताना दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून तेथे आलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या मुलास लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादीचा मुलगा उमेर हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असताना पोलीस ठाण्यासमोरील बाप्ते किराणा दुकानाजवळ आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत त्याला चाँपरने मारहाण करून गंभीर जखमी केले. अशा आशयाची फिर्याद गुरुवारी महेबूब इब्राहिम पारवे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे.

पारवे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

पालिका आणि पोलिसांच्या कृपेने शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. यातूनच आता वाहतुकीला अडथळा आणत रस्त्यावर दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये हाणामाऱ्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिका प्रशासन नेमके एखाद्याचा जीव गेल्यावर जागी होणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 103
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.