Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तिघा आरोपींच्या अटकेनंतर डॉ. प्राची पवार यांच्या हल्ल्यामागील रहस्य उलगडले
गुन्हेगारी

तिघा आरोपींच्या अटकेनंतर डॉ. प्राची पवार यांच्या हल्ल्यामागील रहस्य उलगडले

कोवीड काळातील आत्याच्या मृत्युचा राग मनात धरून केला होता जीवे मारण्याचा प्रयत्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/12/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिकमधील सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण फरार हल्लेखोरांना पकडल्यानंतर समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत कोवीड काळात झालेल्या आत्याच्या मृत्युचा राग मनात धरून हा हल्ला केल्याच हल्लेखोरांनी सांगितल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या डॉ. प्राची पवार ह्या नाशिकचे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते डॉ. वसंत पवार आणि मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या कन्या आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर १३ डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात जीवघेणा हल्ला झाला होता. पवार यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला याचा उलगडा होत नव्हता. अखेर बुधवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांना हल्लेखोरांना अटक करण्यात यश आले. त्यानंतर या हल्ल्यामागील कारण पुढे आले.

हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या अभिषेक दीपक शिंदे याने चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, त्याची आत्या कोवीड काळात डॉ. पवार यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. उपचारादरम्यान आरोपीच्या आत्याचा १३ मे २०२१ रोजी मृत्यू झाला होता. याच घटनेचा राग मनात धरून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर हल्ला केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे.

या हल्ल्यासाठी त्याने धनंजय अजय भवरे, पवन रमेश सोनवणे या दोघांना सोबत घेतले. त्याबदल्यात त्यांना १० हजार रुपये देण्याचेही शिंदे याने कबुल केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.

काय होती नेमकी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुश्रूत हॉस्पिटलच्या संचालक डॉ. प्राची वसंतराव पवार ह्या इनोव्हा कारने गोवर्धन शिवारातील आपल्या घरी पवार फार्मस् येथे जात होत्या. पवार फार्म हाऊसचे गेटवर संशयित आरोपी अभिषेक शिंदे हा त्याची मोटर सायकल रस्त्यात आडवी लावून गाडीवर बसला होता.

त्यामुळे त्यांनी शिंदे याला मोटर सायकल रस्त्यात आडवी का लावली ? अशी विचारणा केली असता, त्याने रस्त्यातील गाडी न हटविता डॉ. पवार यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरत वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान शेजारील पीकात लपून बसलेले त्याचे साथीदार धनंजय भवरे आणि पवन सोनवणे हे दोघे झुडपातून तेथे आले व त्यातील एकाने डॉ. प्राची पवार यांचेशी हूज्जत घालत त्याच्या हातातील लोखंडी धारदार कोयत्याने पवार यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने वार केले. या हल्ल्यात डॉ. पवार गंभीर जखमी झाल्या, त्यावेळी तिस-या आरोपीने लवकर करा, मारून टाका, सोडू नका, असे बोलून तिघांनीही मोटर सायकलवर बसून तेथून पळ काढला होता.

दरम्यान, नाशिक तालुका पोलीस ठाण्यात त्यावेळी अज्ञातांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन आठवडे चाललेल्या तपासानंतर अखेर आरोपींना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

असा लागला सुगावा 

हल्ला केल्यानंतर तिघे आरोपी दुचाकीवरुण भरधाव वेगाने गगंगापूर रोड मार्गे नाशिकच्या दिशेने जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हाच धागा पकडत आणि आरोपींनी परिधान केलेले कपडे, त्यांचे वर्णन याच्या आधारे त्यांनी कुठल्या तरी दवाखान्यात उपचार घेतले असतील हा धागा पकडून त्यांचा शोध घ्यायला सुरवात करण्यात आली. तपास सुरू असताना तिघांनी नाशिक शहरातील एका दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 97
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.