Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे विधान
राजकारण

सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे विधान

भाजप भीती दाखवून घरे फोडत आहे, मात्र त्यांचे घर फुटेल तेव्हा याचे दुःख कळेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2023Updated:13/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस सोबत दगा फाटका केला आहे, त्यामुळे सत्यजित तांबेना काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार नसल्याची मोठी घोषणा करत भाजप दुसऱ्याचे घर फोडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यामुळे सत्यजित तांबे आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेसला दिली होती. काँग्रेसने या जागेवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी स्वतः उमेदवारी दाखल न करता मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान करत सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले आहे.

नाना पटोले म्हणाले, नाशिकमध्ये घडलेल्या कालच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून होतो. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींना माहिती देण्यात आली असून ते याबद्दल निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्व पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, प्रमाणे त्यांनी अर्ज न भरणे ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. त्यांनी आपल्या मुलाला अपक्ष उमेदवारी दाखल करायला लावली आहे.

अपक्ष उमेदवारी करून भाजपचा पाठिंबा घेणे ही एक प्रकारची पक्षासोबत गद्दारी आहे. नासिकमध्ये भाजपने उमेदवार दिला नाही यावरून हा सगळा ठरलेला कार्यक्रम होता. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. त्यांना देखील हे सर्व समजते, असेही पटोले म्हणाले.

या सर्व प्रकारामागे भाजपचा हात असून भीती दाखवून घर तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र जेव्हा भाजपच्या नेत्यांची घरे फुटतील तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असे देखील ते म्हणाले. सत्यजित तांबे यांच्या या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षाने कोरा एबी फॉर्म दिला होता; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

दरम्यान सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार होता. त्यासाठी कोरा एबी फॉर्म दिला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. म्हणाले माझ्यापर्यंत जी ऐकीव माहिती आली त्यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसते. पक्षश्रेष्ठींनी या प्रकारची दखल घेतली पाहिजे किंबहुना ती घेतली आहे. हा विषय आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील असल्याने कदाचित त्यांना यातील अधिक माहिती असू शकेल. तांबे यांना उमेदवारी दिली असताना त्यांनी फॉर्म भरला नाही. त्यांच्या ऐवजी त्यांच्या चिरंजीवांनी अपक्ष अर्ज भरला. यासंदर्भात पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कोरा एबी फॉर्म दिला होता, त्यामुळे सत्यजित तांबे नाही तो भरता आला असता. त्यांनी अपक्ष अर्ज भरला त्यामुळे हे प्रकरण गंभीर वाटत आहे असे चव्हाण म्हणाले.

आम्ही कोणाची घरे फोडत नाही; हर्षवर्धन पाटील

दरम्यान या संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आले असून, काँग्रेसने एबी फॉर्म दिला मात्र उमेदवाराने उमेदवारी न भरता त्यांच्या मुलाने अपक्ष उमेदवारी केली. हा काँग्रेसचा अंतर्गत गोंधळ आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज का भरला, त्यांना एबी फॉर्म का मिळाला नाही, हे आम्हाला माहिती नाही. भाजपची स्थापना कोणाचे घर फोडण्यासाठी झालेली नाही. तेच भाजपने कोणालाही ऑफर दिलेली नाही. अपक्ष म्हणून तांब्यांनी पाठिंबा मागितला असेल तर त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 770
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.