Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक पदवीधर मतदार संघातील भूमिकेबाबत मातोश्रीवर बैठक
राजकारण

नासिक पदवीधर मतदार संघातील भूमिकेबाबत मातोश्रीवर बैठक

भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील बैठकीस उपस्थित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/01/2023Updated:14/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत मातोश्रीमध्ये बैठक सुरू असून या बैठकीमध्ये भाजपकडून लढण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना बळ दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याची अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर भाजपकडून देखील या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली असल्याचा तर्क लावला जात आहे.

त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोर उमेदवारास पक्ष पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सत्यजित तांबे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करण्याचा तांबे यांचा प्रयत्न फोल ठरविण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनीही निवडणूक होऊ देणार नसल्याचे नाशिक मध्ये स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष उमेदवारांमध्ये सामना करणार असल्याचे चिन्ह निर्माण झाली आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीला नाशिक मधील ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित आहे. बैठक सुरू असतानाच बैठकीमध्ये यापूर्वी भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या आणि भाजप व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या धूळ्यातील शुभांगी पाटील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटासह महाविकास आघाडी पाटील यांना पाठिंबा देण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नेमके काय घडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पाटील यांना पाठिंबा दर्शविल्यास उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काय भूमिका घेतात हे बघावे लागेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 388
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.