Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बेरोजगारांना नोकरीची खोटी नियुक्तीपत्रे तयार करणारा छायाचित्रकार पोलिसांच्या जाळ्यात; ५५ लाखाची माया गोळा करणारे चौघे शिर्डी पोलिसांनी पकडले
गुन्हेगारी

बेरोजगारांना नोकरीची खोटी नियुक्तीपत्रे तयार करणारा छायाचित्रकार पोलिसांच्या जाळ्यात; ५५ लाखाची माया गोळा करणारे चौघे शिर्डी पोलिसांनी पकडले

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवत अकरा बेरोजगारांना प्रत्येकी पाच लाख रुपये गंडा घालणारी टोळी शिर्डी पोलिसांनी पकडली आहे. यात एका छायाचित्रकाराचा देखील समावेश आहे.
शिर्डी विमानतळावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकरा बेरोजगारांकडून आरोपींनी आत्तापर्यंत पंचावन्न लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. १४ सप्टेंबरला बीड येथील चंद्रकांत विठ्ठलराव जाधवराव यांनी यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात जाधवराव यांनी म्हटले की माझ्या मुलाचं एकूण अकरा मुलांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन शिर्डी विमानतळावर मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर देखील आरोपींनी नोकरी मिळवून न दिल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता आरोपींनी नोकरीची नियुक्तीपत्रे दिली. याबाबत शिर्डी विमानतळावर गेल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे या मुलांच्या लक्षात आले.
त्यानंतर जाधवराव यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी यासंदर्भात बारकाईने तपास करत निफाडमधील एका आरोपीसह सिन्नरमधील दोघांना ताब्यात घेत त्यांना अटक केली होती. शिर्डी पोलिसांनी गोकुळ राजाराम कांदे (वय ३२, रा. तामसवाडी ता. निफाड जि. नाशिक), गोकुळ ठकाजी गोसावी वय ३१, विलास रामचंद्र गोसावी वय ३५, दोघे रा. मलढोण, ता. सिन्नर जि. नाशिक यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी ही नियुक्तीपत्रे शिर्डी जवळील पोहेगाव येथील अनिल उत्तम शेजवळ या छायाचित्रकाराकडून तयार करून घेतले असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे पोलिसांनी अनिल शेजवळ याला देखील या गुन्ह्यात अटक केली असून अटकेतील आरोपींची संख्या चारवर गेली आहे. राहता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 291
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.