महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार राऊत यांनी नाशिक मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी आक्षेप घेण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेलदार यांच्या तक्रारीवरून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून त्यांची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. बेलदार हे शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले शिवसैनिक आहेत. पंचवटी पोलीस याप्रकरणी खासदार राऊत यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

