Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ३१ गावांमध्ये ५ हजार बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ! मंत्री विखेंच्या पुढाकाराने प्रभावी अंमलबजावणी
विकास

३१ गावांमध्ये ५ हजार बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ! मंत्री विखेंच्या पुढाकाराने प्रभावी अंमलबजावणी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2023Updated:02/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
आश्वी
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाची प्रभावी अंमलबजावणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली असून संगमनेर तालुक्यातील आश्वी मधील ३१ गावामधील नोंदणीकृत ५ हजार ९१६ बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे.

असंघटीत कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ३२ विविध योजनांची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना महत्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागातील इमारत व बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली असून शिर्डी मतदार संघाने यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अधिकृत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळू लागला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. यासाठी जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे मार्गदर्शन बांधकाम कामगारांना करण्यात आले होते.

अधिकृत नोंदणी झालेल्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळत असून मतदार संघातील ३१ गावांमधील ५ हजार ९१६ कामगार सध्या या भोजनाचा लाभ घेत आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात समाविष्ट असलेल्या २२ गावांसह मांलुजे, डिग्रस या गावांसह गणेश परीसरातील ७ गावांमध्ये सध्या कामगार या मध्यान्ह भोजनाचा लाभ घेत असल्याचे दिसून येते.

सध्या स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ३१ गावात योजनेची अंमलबजावणी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आहे. रोज दुपारी वातानुकूलीत गाडीमधून जेवण कामगारांना पोहोच करण्यात येत असून यामध्ये भात, वरण, चपाती, दोन भाज्या असा कॅलरीज देणाऱ्या आहाराचा समावेश असून आता तृणधान्याचा वापरही या आहारात करण्यात येवू लागला असल्याचे दिसून येते.

राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ त्या घटकाला मिळावा हा प्रयत्न सातत्याने राहीला. इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करून आधार देण्याचा प्रयत्न केला. योजनेची अंमलबजावणी शिर्डी मतदारसंघात प्रभावीपणे सुरू झाल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. त्यांच्या कष्टाचा सन्मान योजनेतून करता आला याचा आनंद आहे
राधाकृष्ण विखे पाटील, महसूल तथा पालक मंत्री

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 413
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.