Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाऊसाहेब थोरात यांच्या विचार आणि जीवन कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने काम करण्याची गरज: मधुकरराव नवले
सामाजिक

भाऊसाहेब थोरात यांच्या विचार आणि जीवन कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने काम करण्याची गरज: मधुकरराव नवले

अमृत उद्योग समूहाच्या वतीने 13 व्या स्मृतिदिनानिमित्त भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
कृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांचे विचार आणि जीवन कार्यातून प्रेरणा घेत नव्या पिढीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक मधुकरराव नवले यांनी केले.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. शिक्षक नेते हिरालाल पगडाल कांचनताई थोरात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख अरुण कडू उद्योजक राजेश मालपाणी सुरेश थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

नवले म्हणाले, वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांच्याकडे समाज वाचनाचे सामर्थ्य होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यामुळे त्यांनी एकही काम अर्धवट सोडले नाही. आयुष्यभर समाजासाठी समर्पित भावनेने काम करणारे भाऊसाहेब थोरात एक आदर्श व्यक्तिमत्वच नव्हे तर संगमनेर तालुक्यासाठी देव माणूस होते.

मीटर हटाव चळवळ, पाण्यासाठीचा संघर्ष आदीसह समाज विकासाच्या अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी करून दाखविल्या. सहकाराला शिक्षण आणि दुग्ध व्यवसायाची जोड देत त्यांनी संगमनेर सारखा तालुका समृद्ध करून दाखविला. अनेक संकटे आले तरीदेखील त्यांनी आपला विचार सोडला नाही.

वयाच्या उत्तरार्धामध्ये दंडकारण्य अभियाना सारखी अभिनव योजना त्यांनी देशाला दिली. सहकाराच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी तालुक्यातील सामान्यतील सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. समाज हितासाठी समर्पित भावनेने आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करणारे भाऊसाहेब या तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्व ठरले. त्यामुळे तालुक्यातील तरुणांनी इतिहासाकडे पाठ करून महासत्तेचे स्वप्न पाहणे चुकीचे असल्याचे नवले म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार रणजीत सिंह देशमुख यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 225
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.