Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संपकऱ्यांवर कारवाई सुरू; जिल्हाधिकाऱ्यांनी व्हाट्सअप वर नोटिसा धाडत मागितला खुलासा
प्रशासन

संपकऱ्यांवर कारवाई सुरू; जिल्हाधिकाऱ्यांनी व्हाट्सअप वर नोटिसा धाडत मागितला खुलासा

संपकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
जुन्या पेन्शनच्या मागणी करिता तीन दिवसांपासून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना व्हाट्सअपवर नोटीसा पाठविल्या असून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा तरतुदींचा भंग केल्याचे नमूद करत आपल्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई का करू नये? ‘काम नाही वेतन नाही’ या धोरणाने संप कालावधीतील वेतन कपात का करू नये, अशी विचारणा नोटिसीद्वारे केली आहे.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सही-शिक्क्यानिशी गुरुवारी कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या आत नोटीसीचा खुलासा न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून या नोटीसला कसे उत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.

जुन्या पेन्शन मागणी संदर्भात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला असला तरी सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम सहा अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही निदर्शनात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येऊन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे 13 मार्च रोजीच्या कारणे दाखवा नोटीसमध्ये अवगत करण्यात आले होते. तरी देखील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीचा भंग केल्याने कारवाई का करू नये? संप कालावधीतील वेतन कपात का करू नये? असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.

दरम्यान कर्मचारी संपावर ठाम असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसला कोणीही तोंडी अथवा लेखी उत्तर देऊ नये, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 316
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.