Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वप्नपूर्ती… महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांना मिळाला शेती व घरापर्यंतचा रस्ता
प्रशासन

स्वप्नपूर्ती… महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांना मिळाला शेती व घरापर्यंतचा रस्ता

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील रस्ता खुला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2023Updated:17/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
गावच्या पोलीस पाटलाच्या पुढाकारातून प्रशासनाच्या अजंठावर विषय आल्याने संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील शेत शिवार रस्त्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न महसूल विभागाच्या महत्त्वकांक्षी महा राजस्व अभियानातून अखेर साकार झाले. अभियानातून घर आणि शेतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळाल्याने शेतकरी आनंदित झाले.

सावरगाव तळ येथील विठ्ठल बाजीराव नेहे, जालिंदर सोपान नेहे, शांताराम सोपान नेहे, रावसाहेब यादव नेहे या चार शेतकऱ्यांना घरापर्यंत जाण्यासाठी पायवाट सुद्धा व्यवस्थित नव्हती. तर रघुनाथ लहानु नेहे, नंदराम सीताराम नेहे, बाळासाहेब सिताराम नेहे, रोहित सोमनाथ नेहे, मनाजी मार्तंड नेहे आदि दहा शेतकऱ्यांना त्यांच्या पंधरा हेक्टर शेतीत जाण्या-येण्यासाठी रस्त्याची अतिशय गैरसोय होती.

शेतकऱ्यांच्या सामंजस्यातून सुरू असलेले रस्त्याचे काम

या शेतकऱ्यांना आपला शेतमाल अंदाजे एक किलोमिटर पर्यंत डोक्यावर वाहतूक करावा लागत असे. यातून या शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत असे. आपल्या गावातील शेतकरी बांधवांची ही अनेक वर्षांची रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पुढाकार घेतला.

यात त्यांनी संबंधित सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांना माहिती कळविली असता त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून या सर्व शेतकऱ्यांना महसूल विभागाचे महाराजस्व अभियानातून हा रस्ता खुला करण्याची एक चांगली संधी असल्याचे शेतकऱ्यांना पटवून दिले. यामुळे या सर्व दहा शेतकऱ्यांनी हा रस्ता तयार करण्यासाठी सहमती दर्शविली.

मात्र रस्ता तयार करताना रघुनाथ नेहे, विठ्ठल नेहे, सोपान नेहे यांचे घरांचे तसेच नंदराम नेहे यांच्या शेततळ्याची अडचण होत होती. परंतु आपल्या जीवनातील ही समस्या कायमची सुटत असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या घरांचा व शेततळ्याचा सुद्धा मागेपुढे विचार केला नाही व मनाचा मोठेपणा दाखवत हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करतांना आपली सक्रिय घरे व शेततळेही या शेतकऱ्यांनी काढून घेतले.

पोलीस पाटील गोरक्ष नेहे पाटील यांच्या पुढाकाराने हा शिवार रस्ता तयार झाल्याने अनेक वर्षांच्या संघर्षदायी जीवनात खऱ्या स्वातंत्र्याची पहाट झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अमोल निकम तहसीलदार …
तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांचा संप सुरु असताना गावपातळीवरील शासन प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पुढाकार घेऊन महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातून हा शिवार रस्ता तयार करून वाहतुकीला खुला केला ही पोलीस पाटील यांची कामगिरी कौतुकपात्र आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 383
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.