Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षकांनो शाळेत हजर व्हा, नाहीतर आमच्या मुलांचे दाखले काढून खाजगी शाळेत टाकू… ग्रामपंचायतचे पत्र समाज माध्यमात व्हायरल
शिक्षण

शिक्षकांनो शाळेत हजर व्हा, नाहीतर आमच्या मुलांचे दाखले काढून खाजगी शाळेत टाकू… ग्रामपंचायतचे पत्र समाज माध्यमात व्हायरल

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतचा निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शिक्षकांच्या संपामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांनी शाळेत हजर होऊन सर्व वर्ग चालू करावेत अन्यथा पालकांच्या विनंतीवरून मुलांचे दाखले काढून अन्य खाजगी शाळेत टाकण्याचा इशारा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतच्यावतीने संपकरी शिक्षकांना देण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे पालकांमधून स्वागत होत आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा देखील समावेश आहे. १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू झाले आहे. शाळाच बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसते.

गत दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसला आहे. शैक्षणिक गुणवत्ता कमी झाले असून जिल्हा परिषद शाळेचा पट चांगला राखला जावा, या हेतूने खाजगी शाळा सोडून पालकांनी आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला प्राधान्य दिले आहे. मात्र कोरोना महामारीनंतर आता जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांनी संपाचे हत्यार उपसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू झाले आहे.

एकच मिशन जुनी पेन्शन हा शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठीचा नारा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा ठरू लागला आहे. संपकऱ्यांमुळे विविध कामकाजांवर परिणाम झाला आहे. सरकार संपकऱ्यांबाबत काय निर्णय घेते हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतने उचललेले पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे.

या संबंधीचे मुख्याध्यापकांना पाठविलेले ग्रामपंचायतचे पत्र समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या गावातील शिक्षक या पत्राची किती गंभीरतेने दखल घेतात हे येत्या काही दिवसात समोर येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 377
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.