Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस पाटील गाव पातळीवर सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी राज्याची प्रभावी अंमलबजावणी करणारा घटक: प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे
प्रशासन

पोलीस पाटील गाव पातळीवर सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी राज्याची प्रभावी अंमलबजावणी करणारा घटक: प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
पोलीस पाटील गाव पातळीवरील शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत. गाव पातळीवरील प्रशासनाच्या सर्व विभागांचे पोलीस पाटील प्रमुख आहेत. गाव पातळीवर ते सामाजिक न्याय आणि लोक कल्याणकारी राज्याची प्रभावी अंमलबजावणी करू शकतात, असे प्रतिपादन संगमनेर-अकोलेचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले.

संगमनेर उपविभागातील साठ कामगार पोलीस पाटलांनी आपल्या सेवेचा दहा वर्षाचा कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल आयोजित गुणगौरव सोहळ्यात प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे बोलत होते. यावेळी उपविभागीय वन अधिकारी डॉ. संदीप पाटील, उपविभागीय कृषीअधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार स्वाती घावटे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, पोलीस निरीक्षक भानुदास मथुरे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, उमाकांत कडनोर आदि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. मंगरुळे म्हणाले, आजपर्यंत संगमनेर उपविभागतील सर्व पोलीस पाटलांनी अतिशय उत्तम कार्य केले असून यापुढेही असेच आदर्शवत काम करत राहून आपल्या पदाला एक वेगळी ओळख व प्रतिष्ठा निर्माण करून द्यावी. ब्रिटिश कायदा 1867 नुसार गावात वंशपरंपरागत पोलीस पाटीलपदी नियुक्ती केली जात असे व त्यांना गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था आणि महसूल या बाबत काम करावे लागत असे. परंतु स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात मुलकी पोलीस पाटीलकी रद्द करून पोलीस पाटील अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते. या कायद्यानुसार पोलीस पाटलांना महत्वपूर्ण अधिकार प्राप्त झाले.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांपासून पाटीलकीची गौरवशाली परंपरा आहे. मागील काळात आपल्या आदर्शवत कार्याने अनेक पोलीस पाटील अजरामर झालेले आहेत. हीच गौरवशाली परंपरा आजचेही पोलीस पाटील अतिशय उत्तमरित्या पुढे नेत आहे. स्वातंत्र्यानंतर आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेची संकल्पना राबवित असल्याने समाज्यातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या ध्येयधोरणांची प्रभावी उद्दिष्टपूर्ती म्हणजेच अंत्योदयाच्या धोरणाची व सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर सदैव उपलब्ध असणारा, गावची सर्वांगीण इत्यंभूत माहिती असलेला एकमेव शासन प्रतिनिधी असलेला पोलीस पाटीलच करू शकतो.

उपविभागातील सावरगाव तळ येथील पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी पोलीस पाटील म्हणून दहा वर्षाच्या काळात गावपातळीवर शासन प्रतिनिधी म्हणून लोककल्याणकारी राज्य व सामाजिक न्यायाची अतिशय प्रभावी अंमलबजावणी करत आपल्या कामाचा राज्यपातळीवर आदर्श निर्माण केला. त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने त्यांचे गाव शंभर टक्के ई पीक पाहणी पूर्ण करणारे राज्यातील पाहिले गाव ठरले आहे. आपल्या कर्तव्याबरोबरच पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गावात जल संधारणाचे मोठे काम उभे केले. महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, कृषी, ग्रामविकास व सामाजिक क्षेत्रात पोलीस पाटील म्हणून अतिशय उत्तम कार्य केल्याबद्दल नेहे पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 367
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.