Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीच्या महापशुधन एक्सपोमध्ये ‘रामायण’ महानाट्याचे सादरीकरण
सामाजिक

शिर्डीच्या महापशुधन एक्सपोमध्ये ‘रामायण’ महानाट्याचे सादरीकरण

महानाट्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत आयोध्येमध्‍ये सादर करण्याची खासदार डॉ. विखेंची ग्वाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी:
संगमनेरच्‍या ध्रुव अॅकॅडमी संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेले ‘रामायण’ महानाट्य शिर्डीच्‍या महापशुधन एक्सपोमध्‍ये सर्वांचीच दाद मिळवून गेले. रामायणातील प्रत्‍येक प्रसंगाला उपस्थितांच्‍या ‘जय श्रीराम’ या घोषणेच्‍या मिळालेल्‍या प्रतिसादामुळे सांस्‍कृतीक कार्यक्रमाचे वातावरण पुर्णपणे राममय होऊन गेले.

मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने पशुसवंर्धन विभागाच्‍यावतीने ३ दिवसांचे भव्‍य महाप्रदर्शन शिर्डीमध्ये आयोजित करण्‍यात आले आहे. देशासह राज्‍यातील शेतकरी, पशुपालक आणि शेतीपुरक व्‍यवसाय करणारे तरुण शेतकरी या महाप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. राज्‍यातील विविध भागातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी येत आहेत.

येणाऱ्या प्रत्‍येकासाठी श्रीक्षेत्र शिर्डी हे साईबाबांचे समाधी स्‍थळ मुख्‍य आकर्षण आहेच परंतू या प्रदर्शनातही सांस्‍कृतीक कार्यक्रमांची पर्वणी सहभागी शेतकऱ्यांना मिळावी म्‍हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून विविध सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजनही करण्‍यात आले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज देशमुख यांच्‍या किर्तनापासून ते मराठी वाहीनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकारांची हजेरी या सांस्‍कृतीक व्‍यासपीठावर मुख्‍य आकर्षण असणार आहे.

या महाप्रदर्शनातील सांस्‍कृतीक कार्यक्रमाचा पहिला दिवस मात्र संगमनेरच्‍या ध्रुव अॅकॅडमीमधील विद्यार्थ्‍यांनी चांगलाच गाजविला. अकॅडमी संचालक डॉ. संजय मालपाणी यांच्‍या संकल्‍पनेतून सुमारे ३०० विद्यार्थ्‍यांचा सहभाग असलेले ‘रामायण’ महानाट्य सादर करण्‍यात आले. रामायणातील प्रत्‍येक प्रसंग विद्यार्थ्‍यांनी सादर करुन, या महाप्रदर्शनातील माहोलच संपूर्णपणे राममय करुन टाकला. उत्‍कृष्‍ठ संवाद, प्रसंगानुरुप गाणी आणि नियोजनबध्‍द, लयबद्द पध्‍दतीने विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला रामायणातील प्रत्‍येक प्रसंग उपस्थितांना खेळवून ठेवणारा होता. प्रभु श्रीरामचंद्रांना वनवासात जाण्‍या पासूनचा प्रसंग ते पुन्‍हा आयोध्‍या नगरीतील त्‍यांच्‍या राज्‍याभिषेकापर्यतंचे सर्व प्रसंगी विद्यार्थ्‍यांनी भावना प्रदान पध्‍दतीने सादर केले. विद्यार्थ्‍यांच्‍या या प्रत्‍येक प्रसंगाला उपस्थितांना टाळ्या आणि जय श्रीरामच्‍या घोषणांनी अक्षरक्ष: डोक्‍यावर घेतले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्‍यांचे कौतुक करुन, हे महानाट्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत आयोध्येमध्‍ये सादर करण्‍याची ग्‍वाही दिली. जिल्‍ह्यातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये असलेले कलेचे कौशल्‍य हेरुन डॉ. संजय मालपाणी यांनी सादर केलेल्‍या या महानाट्याची संकल्‍पना सादर करण्‍याचा मान साईबाबांच्‍या शिर्डी नगरीला मिळाला असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले. प्रभु श्रीरामचंद्रांचे चित्र असलेली शाल जनसेवा फौंडेशनने नुकतीच तयार केली असून, या शालीचे विमोचनही या महानाट्याप्रसंगी करण्‍यात आले. ही शाल आणि स्‍मृतीचिन्‍ह देवून जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी मालपाणी यांचा गौरव केला.

अवघ्‍या काही दिवसांवर श्रीराम नवमीचा उत्‍सव येवून ठेपला आहे. श्रीसाईबाबांच्‍या शिर्डीत या उत्‍सवाचे असलेले महत्‍व आणि परंपरा पाहाता शिर्डीत सादर झालेले रामायण महानाट्य शिर्डी नगरीचे वातावरण राममय होण्‍यास उपयुक्‍त ठरले आहे. सर्व शासकीय आधिका-यांसह शिर्डी शहरातील नागरीक, अबाल वृध्‍द, शेतकरी हे महानाट्य पाहण्‍यास मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

या महानाट्यापुर्वी झी मराठी वाहीनीवरील लिटील चॅम्‍स या स्‍पर्धेत यशस्‍वी झालेला गायक सारंग भालके यांनी गीतरामायणातील गाणी सादर केली. या गाण्‍यांना सत्‍यजित सराफ, प्रशांत तिवारी, प्रविण उबाळे यांनी साथसंगत केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 534
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या आणि गेल्या दोन…

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.