महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर वकील संघाच्या कार्यकारीणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. अतुल आंधळे यांचा ३६ मतांनी पराभव केला.
वकील संघाच्या कार्यकारिणी निवडण्यासाठी सोमवारी (१७ एप्रिल) संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मतदान झाले. ३६२ वकिलांनी निवडणुकीत मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. सुहास आहेर यांनी काम बघितले. ढोमसे आणि आंधळे यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत झाली. यात ढोमसे यांना १९८ तर आंधळे १६२ यांना मते मिळाली.
वर्षभरासाठी असलेल्या कार्यकारिणीमध्ये यावर्षी कोणाला संधी मिळते याची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा निवडणूक निकाल आल्यानंतर संपली असून नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

असा आहे निवडणुकीचा सविस्तर निकाल (कंसात मिळालेली मते) :-
अध्यक्ष:- ॲड. अतुल आंधळे (१६२) ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील (१९८ विजयी) बाद मते – २
उपाध्यक्ष:- ॲड. प्रकाश आहेर (१९), ॲड. शरीफ पठाण (१२३) व ॲड. अतुल पवार (२१२ विजयी) बाद मते – ८
महिला उपाध्यक्ष:- ॲड. माया पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
सेक्रेटरी:- ॲड. विक्रांत भालेराव (१२१), ॲड. शहाजी गवांदे (२३७ विजयी) बाद मते -४
सह सेक्रेटरी:- ॲड. अमोल घुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
खजिनदार:- या पदासाठी कोणाचाही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने हे पद रिक्त राहिले आहे.
सदस्य:- ॲड. कैलास दारोळे (२०६), ॲड. योगेश गुंजाळ (२६१ विजयी), ॲड. नवनाथ फटांगरे (२८३ विजयी), ॲड. अजहर सय्यद (२०९ विजयी) व ॲड. किरण वर्पे (२९९ विजयी) बाद मते -२
महिला सदस्य:- ॲड. सुषमा नवले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
वकील संघाच्या अध्यक्षपदी नव्याने निवड झालेले ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील हे वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटना यांच्याशी संलग्न असुन गेल्या अनेक वर्षांपासून विरंगुळा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांनी जिल्हा विधी सेवा समितीच्या माध्यमातून अनेक जनजागृती कार्यक्रम घेतलेले आहेत. याशिवाय त्यांना समाज गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात वकिलांचे प्रश्न सोडवितांना या पदाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष उदयसिंह ढोमसे पाटील यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले.

