Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलांच्या चळवळीतून येणार भीमक्रांती- संभाजी भगत
सामाजिक

महिलांच्या चळवळीतून येणार भीमक्रांती- संभाजी भगत

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज)
महिलांच्या चळवळीमधून भीमक्रांती अवतरेल. महामानव बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देवून या देशात ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन प्रमुख शत्रू असून यांच्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने त्यांना ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले.

तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आश्वी खुर्द येथे बुधवारी (ता. 3 मे) लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आश्वी परिसरातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविस्मरणीय सोहळा अनुभवला.

कार्यक्रमास्थळी पेटत्या मशालीच्या ज्वाळा व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार टाळ्यांच्या गजरात भगत यांचे मंचावर आगमन झाले. त्यानंतर सुमारे अडीच तास आपल्या अनोख्या शैलीतून त्यांनी आश्वीकरांची मने जिंकली.

संभाजी भगत यांच्या एकापेक्षा एक सरस अशा रचनांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ये हिटलर के साथी,जनाजो के बाराती, पुछते नही इन्सान को कौन है तू, पुछते है धर्म और जाती अशा एकापेक्षा एक शाहिरी गीतांनी विषमता, जातीभेद यावर आसूड ओढले. छत्रपती शिवरायांवर बाबासाहेब आटखिळे यांनी अंगावर शहारे आणले. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचेवरील गीतांनी महिलांमध्ये चैतन्य निर्माण झाले.

कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गर्दीमुळे संयोजकांना अधिकच्या स्क्रीन लाऊन गर्दीचे नियोजन करावे लागले. संयुक्त जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी प्रसिद्धीस हपापलेले नसल्याने बॅनरवर केवळ महापुरुषांचे फोटो लावल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सात उच्चशिक्षित डॉक्टर, सहा प्राध्यापक, चार कृषी पदवीधर, दहा शिक्षक, चार अभियंते, दोन वकील, एकवीस विद्यार्थी, पंचेचाळीस शेतकरी, दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, सहा कारागीर, महिला व मुली यांनी कठोर परिश्रम घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे, सचिव राजेंद्र मुन्तोडे व समन्वयक अनिल मुन्तोडे यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 238
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.