Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संदीप वाकचौरेंच्या “ऐसपैस शिक्षण”चे प्रकाशन
शिक्षण

संदीप वाकचौरेंच्या “ऐसपैस शिक्षण”चे प्रकाशन

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 7, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणावरील “ऐसपैस शिक्षण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, लेखक सुनील माळी, प्रकाशक घनश्याम पाटील, सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार प्रकाश टाकळकर आदींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संगमनेरमधील पत्रकार उपस्थित होते.

चपराक प्रकाशनाच्यावतीने शिक्षणासंबंधीची बारा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्या मालेतील संदीप वाकचौरे यांचे हे चौथे पुस्तक आहे. संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाच्यावतीने यापूर्वी शिक्षणाचे दिवास्वप्न, शिक्षणाचे पसायदान, पाटी पेन्सिल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले आहे.

पुस्तकाला माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तर पाठराखण सेवानिवृत्त शिक्षण संचालक व बालभारतीचे भाषा विषयाचे माजी अध्यक्ष शिवाजी तांबे यांची लाभली आहे. आज समाजात अनेक समस्या अधिकाधिक बिकट होत चालल्या आहेत. त्यांची तीव्रता रोज माध्यमांतून समोर येत आहे. समस्या आहेत सार्वत्रिक बेशिस्तीच्या, वाढलेल्या हिंसेच्या, मूल्यांच्या अवमूल्यनाच्या, नागरिकत्वाविषयीच्या बेफिकिरीच्या, असंवेदनशीलतेच्या, मानवतेपुढे उभ्या राहिलेल्या अनेकविध प्रश्नचिन्हांच्या अनुषंगाने वेध घेण्यात आला आहे.

बिघडत चाललेल्या सामाजिक स्वास्थ्यामुळे लोक भांबावून गेलेत. शासन काही तात्कालिक उपाय शोधते पण ते पुरे पडताना दिसत नाहीत. अशा सर्व समस्यांचे मूळ बिघडलेल्या शिक्षणाच्या आरोग्यात आहे. समस्यांचा चिकित्सक उहापोह ‘ऐसपैस शिक्षण’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

त्यांचे हे पुस्तक व्यापक जन-उद्बोधनाची भूमिका बजावत आहे. समाजातील समस्यांची मूळे शिक्षण व्यवस्थेत कशी आहेत याचा त्यांनी या पुस्तकात अनेक अंगांनी वेध घेतलाय. ते केवळ समस्यांचा वेध घेऊन थांबत नाहीत तर त्यावर अनेक व्यावहारिक मार्ग सुचवते. शिक्षण जीवनाभिमुख कसे करता येईल, त्यामधून कालसुसंगत नागरिकत्वाची घडण कशी होऊ शकते यांसारख्या मुद्द्यांचे जागोजागी सोदाहरण विवेचन केले आहे.

समस्यांकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहण्यामुळे त्यांच्या प्रतिपादनात सकारात्मक प्रेरकता आढळते. नवीन शैक्षणिक धोरणातील नावीन्यपूर्ण बदलांमुळे अनेक चांगले बदल घडू लागतील असे वैशिष्ट्यपूर्ण असे हे पुस्तक आहे. प्रास्ताविक संदीप वाकचौरे यांनी तर आभार नितीन ओझा यांनी मानले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 341
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात

April 18, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

April 17, 2026

संगमनेरच्या नगरपालिका शाळांचा कायापालट होणार; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ॲक्शन मोडमध्ये!

January 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात…

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.