Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचे निधन; एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड
इतिहास

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचे निधन; एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

आज अहमदनगरमध्ये अंत्यसंस्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

सर्व सामान्य प्रवाशांची लालपरी असलेल्या आणि राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी (ता. 17 मे 2023) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षाचे होते. गुरुवारी अहमदनगरच्या अमरधाम मध्ये सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

यंदाच्या 1 जून 2023 रोजी पहिल्या एसटीच्या कारकिर्दीच्या प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा चालता-बोलता साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक नव्हते. खासगी बस माळीवाडा परिसरातून बाहेरगावी जात असत. याच परिसरातून पहिली बस पुण्याकडे धावली. त्यावेळी देखील खासगी अवैध प्रवासी वाहतूक होत असे. त्यांच्याकडून ही एसटीला अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असे, जाणकार सांगतात.

अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले.

एसटीला 1 जून रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी सांगता पाहायला ते हवे होते. पण दुर्दैवाने ते मृत्यू पावले. त्यांच्या मृत्युने एसटी महामंडळाच्या परिवाराला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार गमावला आहे.

 

असा होता एसटीचा पहिला प्रवास…

1 जून 1948 रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली होती. त्यावेळी प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोकांकडून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली जात असे. पुण्यातील शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस अहमदनगरमधील माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली होती. पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 631
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

17/02/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.