Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मेव्हण्याच्या खून प्रकरणी न्यायालयाने दिला हा निर्णय… संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील खून खटला
न्यायालय

मेव्हण्याच्या खून प्रकरणी न्यायालयाने दिला हा निर्णय… संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील खून खटला

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 19, 2023Updated:May 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – स्वतःच्याच मेव्हण्याचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. अनैतिक संबंधातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे सिद्ध करण्यात साक्षीदार आणि सरकार पक्षाला यश आले नाही. किरण नानाभाऊ दुशिंग असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे.

१ नोव्हेंबर २०१३ रोजी घडलेल्या या खून प्रकरणी न्यायालयाने १३ मे २०२३ रोजी निकाल दिला आहे. घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २ नोव्हेंबर २०१३ रोजी कोकणगाव परिसरातील सुकओहळाचे पाणी साठवलेल्या तलावामध्ये भाऊसाहेब दगडू गवांदे याचा मृतदेह आढळून आला होता. भाऊसाहेब याचा विवाह २८ ऑक्टोंबर २०१३ रोजी कोकणगाव येथील महादेव मंदिरात उंबरे ता. राहुरी येथील मंजुषा नानाभाऊ दुशिंग हिच्यासोबत साध्या पद्धतीने झाला होता. मंजुषा हिचा हा दुसरा विवाह होता. विवाहानंतर १ नोव्हेंबरला पोखरी हवेली येथे फिर्यादीच्या घरी लग्नानंतरच्या सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

या पूजेसाठी आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग व त्याचा मित्र सागर सुरेश धोत्रे उपस्थित होते. सायंकाळी फिर्यादीच्या घरासमोर जेवण सुरू असताना किरण दुशिंग याने मेव्हणा भाऊसाहेब याला नातेवाईकाच्या डाळिंबाच्या बागेत फिरून येऊ व नंतर जेवण करू असे सांगून त्याला सोबत आणलेल्या मित्रासोबत दुचाकीवर बसवून नेले मात्र त्यानंतर ते घरी परतले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब याचा मृतदेह कोकणगावच्या तलावात आढळून आला होता.

मृत भाऊसाहेब याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच्या फिर्यादी वडिलांना समजले की, किरण दुशिंग याचे त्याच्या सावत्र बहिणी सोबत पूर्वीपासून अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे आरोपीने मंजुषा हिचे पहिले लग्न सोडचिट्टी करून घेऊन मोडण्यास भाग पाडले होते. तर तिच्या दुसऱ्या लग्नास किरण याचा विरोध होता. परंतु त्याच्या विरोधाला न जुमानता त्याच्या आईने मंजुषा हिचा विवाह भाऊसाहेब याच्यासोबत लावून दिला होता. मंजुषा हिच्यासोबत चा अनैतिक संबंधांना अडथळा येऊ नये यासाठी किरण दुशिंग यांनी सागर धोत्रे यांच्या मदतीने भाऊसाहेब याला तलावाच्या पाण्यात बुडवून जीवे मारले अशा आशयाची फिर्याद दगडू गवांदे यांनी ४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिल्याने आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. आरोपीच्यावतीने ॲड. शरीफ पठाण व ॲड. मोहसीन खान यांनी काम बघितले. खटल्यातील प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी लक्षात घेत सरकार पक्षाला आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात यश आले नाही. साक्षीदारांच्या विसंगत साक्षी आणि परिस्थितीजन्य पुरावा पुरेसा नसल्याचा निष्कर्ष नोंदवत न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,077
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.