Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समनापुर दगडफेक दंगल प्रकरणी १७ आरोपींना जामीन मंजूर; दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत मंगळवारी पोलीस ठाण्यात लावावी लागेल हजेरी
न्यायालय

समनापुर दगडफेक दंगल प्रकरणी १७ आरोपींना जामीन मंजूर; दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत मंगळवारी पोलीस ठाण्यात लावावी लागेल हजेरी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – समनापुर (संगमनेर) येथील दगडफेक दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १७ आरोपींना शुक्रवारी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर संगमनेरच्या न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच जामीन अर्ज मंजूर करतांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांनी सर्व आरोपींना या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल होईस्तोवर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे.

संगमनेरमधील भगवा मोर्चा संपल्यानंतर पुन्हा परतणाऱ्या काही मोर्चेकर्‍यांनी शहराजवळील समनापुर मध्ये दुसऱ्या समुदायांच्या घरांवर दगडफेक मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यात तिघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे राहाता तालुक्यातील पाच जणांसह संगमनेर तालुक्यातील बारा जणांना अटक केली होती.

शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांच्यासमोर उभे करण्यात आले होते. यावेळी आरोपींच्या वकिलांनी हा प्रकार उत्साहाच्या भरात घडल्याचे नमूद करत आरोपींची स्वच्छ पार्श्वभूमी त्यांचे भविष्य या मुद्द्यावर युक्तिवाद करत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यासह जामीनावर सुटका करण्याची मागणी केली होती. सरकार पक्षाचा आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. सुटकेपूर्वी सर्व आरोपींनी आपल्या नातेवाईकांचे संपर्क क्रमांक व पत्ता देण्यासह आरोपपत्र दाखल होईस्तोवर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले त्यावेळी न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांसह सकल हिंदू समाज भगवा मोर्चाचे आयोजक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 991
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.