Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तस्करांनी वाळू तस्करी करायची… नागरिकांनी आंदोलन करायचे आणि प्रशासनाने केवळ हफ्तेखोरीच करायची का?
आंदोलन

तस्करांनी वाळू तस्करी करायची… नागरिकांनी आंदोलन करायचे आणि प्रशासनाने केवळ हफ्तेखोरीच करायची का?

विद्यमान महसूलमंत्र्यांच्या विशेष लक्ष असलेल्या गावातच वाळू धोरणाला तीलांजली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवारी सकाळी पर्यावरण प्रेमींनी पुन्हा जाळल्या वाळूच्या गोण्या!

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाला तिलांजली देण्याचे काम त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेर शहरात होत आहे. वाळू धोरणाची पायमल्ली होत असताना संगमनेरमधील महसूलचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीतून वाळू तस्करी सुरू असल्याचा प्रकार पर्यावरण प्रेमींनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्रवरा नदी परिसरात गंगामाई घाटावर फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नदी काठावरील पायऱ्यांवर वाळूने भरलेल्या गोण्या रिकाम्या करत त्या पेटवून दिल्या. तीन-चार महिन्यापूर्वी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन ताजे असतानाच आता पुन्हा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे संगमनेरचा महसूल विभाग याकडे किती गांभीर्याने बघतो हे लवकरच स्पष्ट होईल.

विशेष म्हणजे या गंगामाई घाट परिसरात सकाळ संध्याकाळ दररोज मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. या नागरिकांसमोरूनच वाळू तस्करी देखील जोमात सुरू असते. कोणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर वाळू तस्करांकडून त्याला दादागिरी केली जाते. वाळू तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघात देखील घडलेले आहेत. शिवाय हा केवळ संगमनेरचाच प्रश्न नसल्याने राज्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल मंत्र्यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी त्याचा फारसा फायदा होत असल्याचे दिसत नाही. या धोरणाला तिलांजली देत वाळू तस्कर वाळू तस्करी करतच आहे.

संगमनेरच्या प्रांताधिकारी आणि तहसीलदार पदाची सूत्रे काही दिवसांपूर्वीच अमरावती विभागातून बदलून आलेल्या अनुक्रमे शैलेंद्र हिंगे व धीरज मांजरे यांनी स्वीकारली असली तरी आत्तापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात वाळू तस्करांवर ठोस कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. पालकमंत्री असलेल्या महसूलमंत्र्यांच्याच धोरणाची अंमलबजावणी त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेरमध्येच होताना दिसत नाही. 

त्यामुळे या वाळू तस्करीत नेमका कोणाचा आशीर्वाद आहे. वाळू तस्करीत महसूलच्या अधिकारी मोठ्या प्रमाणात आर्थिक हप्तेखोरी करत असल्याचे आरोप नागरिकांमधून नेहमीच होताना दिसतात. त्यामुळे वाळू तस्कर वाळू तस्करी करणार… नागरिक आंदोलन करणार आणि महसूल प्रशासन फक्त हप्तेखोरीच करणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. हे चक्र जर असेच सुरू राहणार असेल तर येथील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,117
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.