Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रक्तदानाची क्षमता हे माणसासाठी वरदान – राजेश मालपाणी
सामाजिक

रक्तदानाची क्षमता हे माणसासाठी वरदान – राजेश मालपाणी

दामोदर मालपाणी यांचा स्मृतीदिन; सव्वाशे रक्त पिशव्यांचे झाले संकलन
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 17, 2023Updated:June 17, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – रक्तदानाची क्षमता हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतात आणि कितीतरी परिवारांना सावरणे शक्य होते. रक्तदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानाचे महत्त्व प्राप्त असून त्याला जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या उद्योग समूहावर नीति आणि सदाचाराचे संस्कार करणार्‍या दामोदरशेठ यांच्या प्रत्येक स्मृतीदिनी रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्या स्मृतींना खर्‍याअर्थी उजाळा देणारा असल्याचे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले.

मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 48 व्या स्मृती दिनानिमित्त अर्पण रक्त पेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून 127 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे व्यवस्थापक रमेश घोलप, शिवाजी आहेर, अर्पण रक्तपेढीच्या डॉ. मधुरा पाठक, डॉ. जैन व प्रमिला कडलग आदी यावेळी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाले, स्वर्गीय दामोदर मालपाणी दानशूर म्हणून संगमनेरकरांना परिचित होते. त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर उपक्रम करणे हे त्यांच्या दानशूरतेला अतिशय साजेसे आहे. नवनवीन संशोधनामुळे रक्तदान अधिक महत्त्वाचे झाले आहे. अत्याधुनिक वैद्यक शास्त्रामुळे रक्तातील विविध घटक वेगळे करून एकाच रक्ताच्या पिशवीतून अनेकांना त्याचा लाभ होवू शकतो.

विशेष म्हणजे रक्तदानाला धनाची नव्हे तर फक्त मनाची श्रीमंती आवश्यक असते असे सांगत मालपाणी उद्योग समूहातील कामगार सहकारी स्वयंस्फूर्तीने वर्षानुवर्षे रक्तदानाचा हा उपक्रम राबवतात. या उपक्रमातून स्वर्गीय दामोदरजींच्या कार्याचेच दर्शन घडते असेही त्यांनी सांगितले.

डॉ. पाठक यांनी रक्तदानाचे फायदे शास्त्रशुध्द पद्धतीने समजावून सांगितले. रमेश घोलप यांनी प्रभावी बोधकथा सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. संतोष राऊत यांनी केले.

यावेळी रवींद्र कानडे, देवदत्त सोमवंशी, विशाल बाजपेयी, मनोज हासे, मंगेश उनवणे, प्रदीप कानवडे, अनिल दणदणे, गौरव काथे, मुरारी देशपांडे, किशोर वडनेरे, संतोष गुंजाळ, संतोष बुर्‍हाडे, विनायक भोईर, प्रशांत कर्पे, सीए तुषार कटारिया, बाळासाहेब हासे, सीए कल्पेश दरक, निलेश सदावर्ते, विशाल झांबरे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 433
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.