Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विकास व प्रगतीमुळे संगमनेरचा राज्यात सन्मान; संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही : आमदार थोरात
आरोग्य

विकास व प्रगतीमुळे संगमनेरचा राज्यात सन्मान; संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही : आमदार थोरात

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

समनापुर येथे दूध संघाच्या मेडिकल शुभारंभ

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादित होत असून साखर कारखाना व दूध संघामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली आहे. संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. संगमनेर तालुक्याचा विकास व प्रगतीमुळे राज्यात सन्मान होत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

समनापुर येथे दूध संघाच्यावतीने ‘राजहंस मेडिकल’च्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संचालक विलास वर्पे, संतोष मांडेकर, डॉ. प्रमोद पावसे, सोमनाथ जोंधळे, सरपंच कमलताई बर्डे, भास्कर शरमाळे, पोलीस पाटील गणेश शरमाळे, भाऊसाहेब शरमाळे, महेश शरमाळे, बाजीराव शरमाळे, मोहनराव शरमाळे, स्वाती शरमाळे, राजेंद्र गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यात वैभवशाली ठरला आहे. विकास, प्रगती व चांगले वातावरण यामुळे संगमनेरचा राज्यात सन्मान होतो आहे. मात्र हा लौकिक काही लोकांना पहावत नसल्याने ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रवृत्ती आपण ओळखल्या पाहिजे.

अनेक दिवसांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाणी दुष्काळी भागात आले. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले मात्र या सरकारला जनतेचा आनंद पहावत नाही, त्यांनी घाईघाईने पाणी बंद केले. ते संगमनेर तालुक्यात बिघडवायला येतात आपण मात्र तिकडे घडवायला गेलो. तालुक्यातील व राज्यातील जनतेचा मोठा विश्वास आपल्यावर असून हा संगमनेर तालुक्याचा सन्मान आहे.

दूध संघाने कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतली असून कोरोनाच्या काळात सर्व बंद असताना दूध मात्र चालू होते. आपल्या संघाने कायम शेतकऱ्यांना मदत केली असून खाजगी दूध संघामध्ये फक्त फायद्यासाठी शेतकऱ्यांकडे येतात.

तालुक्याची शांतता सुव्यवस्था व चांगले वातावरण टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना एकजूटीने काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले

रणजीतसिंह देशमुख म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी दूध संघाची वाटचाल सुरू असून दूध उत्पादन वाढवताना खर्च कमी व्हावा, यासाठी राजहंस मेडिकलच्या माध्यमातून कमी दरात औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. मुक्त संचार गोठा, मूरघास हे नवनवीन प्रकल्प राबवले जात असून लसीकरणासाठी ही मोठे काम केले जात आहे. खाजगी दूध संघ नफेखोरी करण्यासाठी काम करतात तर सहकारी दूध संघ हा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी भास्कर शरमाळे, गणेश शरमाळे, यांची भाषणे झाली. समनापुरमधील नागरिक, महिला, युवक व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 904
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

July 4, 2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

June 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली:  जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.