Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण; “वारी आपल्या दारी” संपर्क सूचीमुळे वारकऱ्याला मिळाली वेळेत आरोग्यसेवा
प्रशासन

जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण; “वारी आपल्या दारी” संपर्क सूचीमुळे वारकऱ्याला मिळाली वेळेत आरोग्यसेवा

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी करमाळा तालुक्यात उपलब्ध करून दिली आरोग्यसेवा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 25, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवारी मध्यरात्री सालीमठ यांच्या मोबाईलवर आलेल्या आपत्कालीन फोनची दखल घेत पुढील सूत्रे फिरल्याने हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकली.

आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.

शनिवारी (दि. 24 जून) अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी हृदयविकाराचा अटॅक आला. पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे दुसरे सहकारी वारकरी शामराव घोलप यांनी “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचीमधून मोबाईल क्रमांक पहात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना मध्यरात्री फोन करून घटनेची माहिती देत मदत मागितली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन क्षणाचाही विलंब न करता सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना रात्री २.४६ वाजता दूरध्वनीद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली व वारकरी पवार यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची सूचना केली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या सूचनेची त्वरेने दखल घेत सोलापूर प्रशासनाने देखील तत्परता दाखवत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत वारकऱ्याला वैद्यकीय सेवा दिली. तत्परतेने व वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्याने पवार यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 574
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

तुकाराम मुंडेंचा आदेश अन् अहिल्यानगरमध्ये धडक कारवाई! नामांकित ब्रँड्सचे लाखो रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

June 3, 2026

संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद व पोलिसांचा मोठा हातोडा; सात कत्तलखाने केले जमीनदोस्त

June 2, 2026

‘यासाठी’ वेदांत वाईन्सला नगरपरिषदेची नोटीस

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.