Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा जयहिंद लोक चळवळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करणार: आमदार सत्यजित तांबे यांची माहिती
शेती व सहकार

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा जयहिंद लोक चळवळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करणार: आमदार सत्यजित तांबे यांची माहिती

वसंतराव नाईक जयंती निमित्त लवकरच होणार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळावा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 26, 2023Updated:June 26, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन, कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

देशात आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ असे सतत चाललेले दृष्टचक्र व काही चुकीची कृषिधोरणे, विशेषतः निर्यातीचे धोरण (भावाची कधीही शाश्वती नसणे) अशा विविध संकटाना शेतकरी सतत तोंड देत असतो. घटती उत्पादकता व वाढता उत्पादन खर्च यामुळे देखील शेतीचे अर्थकारण सातत्याने बिघडत चाललेले आहे. तथापि कृषी क्षेत्रात काही ठोस उपाययोजना केल्यास शेती आपले बलस्थान होऊ शकते असे मत आमदार तांबे यांनी व्यक्त केले.

राज्याचे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सुदृढ ग्राम, क्रीडा, आरोग्य, उद्योग व स्वयंरोजगार, वाचन चळवळ यांसारख्या अन्य 15 क्षेत्रात देखील जयहिंद लोक चळवळीचे काम सुरू आहे.

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, सुदृढ समाजाच्या निर्मितीचे आपण भागीदार बनले पाहिजे या भावनेने आमदार थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी 22 वर्षांपूर्वी जयहिंद लोक चळवळीची स्थापना केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 563
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.