महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – जैन परंपरेचा चातुर्मास रविवारपासून (दि. ०२ जुलै) सुरु होत असुन संगमनेर येथील जैन स्थानकमध्ये प्रखर व्याख्याता पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. व विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. या साध्वींचा चातुर्मास होणार आहे, अशी माहिती संगमनेर संघाचे संघपती शिरीष दर्डा व चातुर्मास समितीचे अध्यक्ष राजकुमार पारख यांनी दिली.
चातुर्मास निमित्त साध्वींजींचा मंगल प्रवेश गुरुवारी (दि. २९ जुन) संगमनेर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेपासून शोभा यात्रेने जैन स्थानक, सुयोग सोसायटीमध्ये सकाळी साडेआठ वाजता आगमन होणार आहे. मंगल प्रवेश निमित्त सकल जैन समाजाला गौतम प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांच्या मंगल प्रवेश व शोभा यात्रेमध्ये सकल जैन समाज व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्थानकवासी जैन संघ संगमनेरच्यावतीने संघाचे विश्वस्त वसंत फिरोदिया व प्रफुल्ल बोगवत यांनी केले आहे. चातुर्मास यशस्वी करण्यासाठी जैन युथ फेडरेशन, जैन सोशल लेडी ग्रुप, कन्या मंडळ प्रयत्नशिल आहे. चातुर्मास काळात सर्वांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

