महाराष्ट्र संवाद न्यूज
गुरुवारी (ता. 29 जून) आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बोटा आणि कुरकुटवाडी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या शाखांची स्थापना करण्यात आली. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा नारा घुमणार आहे.
विहिंप बजरंग दलाच्या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी जय श्रीराम…! जय कारा वीर बजरंगी, हर हर महादेव..! छत्रपती शिवाजी महाराज की जय…!च्या घोषणा देवून फटाके वाजवण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद म्हणून खिचडी व केळी वाटप करण्यात आले.
बजरंग दल संगमनेर प्रखंड संयोजक कुलदिप ठाकूर यांनी ध्वज पूजन करून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सेवा, संस्कार व सुरक्षा या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. हिंदू मुलींना फूस लावून लव्ह जिहादमध्ये अडकवण्याच्या षडयंत्राबद्दल ग्रामीण भागात सतर्क होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
गोहत्येमध्ये संगमनेर तालुक्याचे नावं महाराष्ट्रात कुप्रसिद्ध झाले आहे. ते बदलायला शेतकऱ्यांनी खाटकांना गोवंश विकू नयेत म्हणून विनंती केली. ज्यांना सांभाळणे शक्य नाही त्यांनी आम्हांला संपर्क करण्याचे आवाहन यावेळी केले.
विहिंप बजरंग दल, घारगावं, बोटा व कुरकूटवाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या घोषणा विहिंप जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे व गोपाल राठी यांनी यावेळी केल्या.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये विहिंप धर्म प्रसार जिल्हाप्रमुख प्रशांत बेल्हेकर, बजरंग दल विभाग संयोजक सचिन कानकाटे, विहिंप विभाग मंत्री सुनिल ख्रिस्ती, अश्विन बेल्हेकर आदी उपस्थित होते.

