Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सांत्वन..! आजच्या पिढीतील व्यक्तीने केलेले एक सांत्वन…
सामाजिक

सांत्वन..! आजच्या पिढीतील व्यक्तीने केलेले एक सांत्वन…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/06/2023Updated:30/06/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

“बंटी, काय करतोयेस” आईनं विचारलं.

“गेम खेळतोय” मोबाइलवरची नजर न हटवता बंटीनं उत्तर दिलं.

राजला फोन कर

कोण राज???

तुझा मावसभाऊ, सुमा मावशीचा मुलगा,

मी कशाला फोन करू

अरे, त्याचे वडील गेले

मग!

अशी घटना घडली की भेटायचं असतं. तू काही जाणार नाहीस निदान फोन तरी कर. तुम्ही एकाच वयाचे आहात.

त्याचा काय संबंध,

मी सांगते म्हणून फोन कर

फोर्स करू नकोस. काही फोन बिन करणार नाही. तसंही आमचं रिलेशन फक्त नावलाच आहे

दोन मिनिटं तर बोलायचयं.

मित्रांशी कसा तासनतास बोलतोस

उगीच मित्रांना मध्ये आणू नकोस, बंटी चिडला.

मग फोन कर

आता तर मुद्दाम करणार नाही

बंटी, डोकं फिरवू नकोस. फोन कर

नाही म्हणजे नाही

अशावेळेस मन सैरभिर होऊन खूप खूप एकटं वाटतं, या दु:खाच्या वेळी धीर देणं आपलं कर्तव्य आहे.

माझ्या फोननं असा काय फरक पडणारये!

ही जग रीत आहे.

तू पाळलीस ना. मला आग्रह करू नकोस. आठवीत असताना तीन वर्षांपूर्वी भेटलो त्यानंतर राजची भेट नाही.

काही फरक पडत नाही. राजचा मोबाईल नंबर पाठवलाय

आई, नको ना. काय बोलू काहीच माहिती नाही

फोन कर. आपोआप सुचेल

माय-लेकात बराच वेळ वाद चालू होता. बंटीच्या प्रत्येक प्रश्नावर आईकडं उत्तर होतं. शेवटी बंटी तयार झाला.

तू तुझ्या कामाला जा. मी कॉल करतो. अशी समोर उभी राहून टेंशन देऊ नको

ओके, शहाणा माझं बाळ!!!

बंटीच्या डोक्यावरून हात फिरवून आई किचनमध्ये गेली.

बंटीच्या मनात विचारचक्र सुरू झाले. राजचा नंबर डायल करायची हिंमत होत नसल्याने चलबिचल वाढली, शेवटी नंबर डायल केला. रिंग वाजत होती अन बंटीच्या छातीतली धडधड वाढली.

“हॅलो, राज”

“येस, कोण?”

“मी बंटी”

“सॉरी, मी ओळखलं नाही”

“मीनू मावशीचा मुलगा. आपण फोनवर पहिल्यांदाच बोलतोय”

आता लक्षात आलं. बोल!

तुझ्या पप्पांबद्दल कळलं. सॉरी यार!

हंsssम

कसायेस आणि मावशी कशीयं

थॅंक यू फॉर कॉल. मी ओकेयं पण ममा सारखी रडतेय आणि मला रडायलाच येत नाही त्यासाठी बाकीचे माझ्यावर प्रेशर टाकतायेत.

म्हणजे

सगळं इतकं अचानक घडलंय की काहीच समजत नाही. रात्री अकरापर्यंत छान गप्पा मारणारे पप्पा सकाळी उठतच नाही. इट्स शॉकिंग, अनबिलिवेबल, लाईफ एकदम फ्रीज झालंय. कसल्याच फिलिंग नाहीत.

माहिती नाही अशावेळी काय बोलायचं, पण आईनं खूप आग्रह केला म्हणून खरंतर फोन केला, बंटी

मला आवडलं

काय?

खरं बोललास ते. खूप लोक येऊन भेटतायेत. फोन तर चालूच आहेत. सारखं तेच तेच ऐकुन जाम बोर झालोय. सगळे तेच ते बोलतात.

नंतर बराच वेळ बंटी आणि राजचा फोन चालू होता.

बंटी,तुझ्याशी बोलून भारी वाटलं. घरी ये ना,

उद्या येतो. पिझ्झा आणू की बर्गर, बंटीनं विचारलं.

“दोन्ही चालेल” उत्तर देताना राजला एकदम भरून आले.

राज!

पप्पाची खूप आठवण आली. ते सुद्धा पिझ्झा की बर्गर असंच विचारायचे अन माझं ‘दोन्ही’ हे उत्तर ठरलेलं.

बंटी, माझे पप्पा खूप चांगले होते. त्यांच्या अचानक जाण्यानं काय नुकसान झालंय, मी काय गमावलं हेच समजत नाहीये. आठवडा झाला पण अजून डोकं सुन्न आहे. हजारदा पप्पांचा नंबर डायल केला. अजूनही वाटतं फोन उचलून नेहमीच्या प्रसन्न आवाजात म्हणतील ‘बोल डार्लिंग!

पण …राजला पुढं बोलता येईना त्यामुळे त्याला शांत कसं करावं हे न समजल्यानं बंटीचा गोंधळ उडाला. परंतु राजनंच स्वतःला सावरलं.

“सॉरी, जरा इमोशनल झालो”

“इट्स ओके, आपण भेटूच. बरं झालं मी फोन केला.” बंटी

“तुझ्याशी बोलल्यावर खूप रीलक्स वाटतंय. गेला आठवडाभर ‘बिचारा’, ’वाईट झालं’, काळजी घे’ ‘आईला आता तुझाच आधार आहे’ हेच सारखं सारखं कानावर पडत होतं. आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलीय असं वाटतं होतं. माझ्या बाजूने कोणी विचारच करत नव्हतं. ममाला अजून त्रास होईल म्हणून तिच्याशी बोललो नाही पण तू फोन केलास पण आपलं ट्यूनिंग जमलं. थोड मन हलकं झालं” राज.

“टेक केअर”

“येस. प्लीज उद्या ये, बाय”

राजचा आवाज कातर झाला तेव्हा आलेला हुंदका बंटीनं कसाबसा आवरला आणि किचनमध्ये जाऊन आईला बिलगल्यावर बंटी डोळ्यातल्या पाणी रोखू शकला नाही.

एक संपलं, पण सांत्वन कॉलनं दुसरं नातं रिचार्ज झालं.

अनामिक (साभार समाज माध्यम)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 465
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.