Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार आज पुन्हा उपमुख्यमंत्री; सोबत नऊ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
राजकारण

अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार आज पुन्हा उपमुख्यमंत्री; सोबत नऊ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2023Updated:02/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवा धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत विरोधी पक्ष नेते अजित पवार आज राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर यावेळी त्यांनी भर दुपारी बंडाचा झेंडा फडकविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून आपली एकजूट कायम असल्याचे वारंवार सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचा प्रयोग केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याचे वारंवार समोर येत होते. अखेर पहाटेच्या शपथविधीनंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे 2019 नंतर अजित पवार तिसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहे.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. या सरकारची वर्षपूर्ती होत नाही तोच, आज पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघावयास मिळाली. या मोठ्या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा राजकारणात नवा ट्विस्ट बघावयास मिळाला.

रविवारी दुपारी राज भवनामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील व संजय बनसोडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या सर्वांना कोणते खाते मिळते हे लवकरच समोर येईल. दरम्यान अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर आज राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 700
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.