Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ – दूर्गाताई तांबे
सामाजिक

दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ – दूर्गाताई तांबे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सृष्टीसाठी काम करणारी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची महाराष्ट्रातील मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर विविध शासकीय विभाग व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर समवेत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, संतोष हासे,ॲड. मधुकर गुंजाळ, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, दशरथ वरपे, अनिल थोरात, सतीश गुंजाळ, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, बी. एन. सावंत, बाळासाहेब फापाळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दंडकारण्य अभियान हे सजीव सृष्टीला वरदान ठरणारे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हिरवाईचा तालुका निर्माण करण्यासाठी मागील सोळा वर्षापासून काम होत आहे. तीस कोटी बिया व लाखो वृक्षांचे रोपण झाले आहे. पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाची मूलभूत कर्तव्य असून कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. हाच ऑक्सिजन आपल्याला आयुष्यभर देणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि संवर्धन प्रत्येकाने केलीच पाहिजे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, वृक्षारोपण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने आपली वस्ती, गाव हिरवाईने नटेल यासाठी काम केले पाहिजे. मोकळ्या जागेत गायरान जमिनी यावर वृक्षारोपण करा. एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना तालुक्यात राबवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय व्हा. यावर्षी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात 2500 वटवृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. विविध सहकारी संस्थांनी वेगवेगळ्या डोंगरांवरती वृक्षारोपण करून त्याची जबाबदारी घेत हे डोंगर हिरवाईने फुलवूया असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले तर जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

पिंपळगाव येथे शुभारंभ…

यावर्षीच्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ पिंपळगाव येथील कनकेश्वर डोंगरावर होणार असून चंदनापुरी घाट येथे आनंद मेळावा होणार आहे. गावोगावी वृक्षारोपणासह रस्त्यांच्या दुतर्फा व मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच चंदनापुरी घाट व क-हे घाटासह महामार्गाच्या दुतर्फा फुलांचे रोपण करण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 476
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.