Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वेगवेगळ्या घटनात संगमनेर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू; शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने गोंधळ
अपघात

वेगवेगळ्या घटनात संगमनेर तालुक्यात पाच जणांचा मृत्यू; शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने गोंधळ

अपघातात दोघांचा, पाण्यात पडून दोघांचा तर गळफास घेऊन एकाचा मृत्यू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2023Updated:03/07/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – रविवारचा दिवस संगमनेरकरांसाठी घातवार ठरला. दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, जवळे कडलग आणि पेमगिरी येथे पाण्यात पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या पाचही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी बराच काळ उपलब्ध न झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या संदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संगमनेर शहरातील देवी गल्ली येथील अनुकूल सत्यवान मेंढे (वय २१ वर्षे) या तरुणांचा निळवंडेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मेंढे याला उपचारासाठी रात्री संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरा अपघात कोल्हार घोटी राज्य मार्गावर वडगाव पान शिवारात घडला. वडगाव पांडू नका जवळ स्वामी समर्थ मंदिरापाशी रविवारी रात्री झालेल्या या अपघातात संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील अमोल गजानन सानप या तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याला देखील जखमी अवस्थेत उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे पुष्पा उत्तम डुबे (वय ४२ वर्ष, रा. पेमगिरी) या महिलेचा शेततळ्यातील पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. डुबे शेततळ्यात पडल्याचे लक्षात येतात त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात संदीप सोमनाथ डुंबरे (रा. पेमगिरी) यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची दुसरी घटना संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात घडली. ज्योती संतोष पाटेकर (वय ३८ वर्षे, रा. आरेवाडी, ता. कराड) असे पाण्यात पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती पाटेकर यांचा मृतदेह शशिकांत प्रभू हांडे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. विहिरीतून वर काढत उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी शशिकांत हांडे यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याशिवाय घरातील छताला असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केलाचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी या गावात समोर आला. अश्विन बाबुराव वर्पे (वय २८ वर्षे, रा. निमगाव टेंभी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेतल्याचा हा प्रकार लक्षात येताच त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. याप्रकरणी अमोल खंडेराव वर्पे यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,502
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.