Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १५ व १६ जुलैला संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा; सहा गटात होणाऱ्या स्पर्धेत राज्यसंघात जाण्याची संधी
क्रिडा व कला

१५ व १६ जुलैला संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा; सहा गटात होणाऱ्या स्पर्धेत राज्यसंघात जाण्याची संधी

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांची माहिती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 6, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने येत्या १५ व १६ जुलैला संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या सहा गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चार प्रकारात राज्य पातळीवर जाण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली आहे.

स्पर्धेत सहभागासाठी ऑनलाईन पद्धतीने १३ जुलै पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसारासाठी तालुका स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत योगासन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया व नॅशनल गेम्स या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील योगासनांचा समावेश करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राने सुवर्ण कामगिरी करतांना पदकांची लयलुट केली.

स्पर्धकांच्या सातत्यपूर्ण यशाने मनोबल उंचावलेल्या राज्य योगासन संघटनेने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली असून त्या माध्यमांतून योगामधील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची राज्य पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे.

पुढील आठवड्यात शनिवारी (ता.१५) व रविवारी (ता. १६) नाशिक पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे या स्पर्धा पार पडणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत ९ ते १४ वयोगटासाठी सब ज्युनिअर, १४ ते १८ वयोगटासाठी ज्युनिअर, १८ ते २८ वयोगटासाठी सीनियर, २८ ते ३५ वयोगटासाठी सीनियर (अ), ३५ ते ४५ वयोगटासाठी सीनियर (ब), ४५ ते ५५ वयोगटासाठी सीनियर (क) अशा सहा गटांमध्ये स्पर्धेची विभागणी करण्यात आली आहे.

त्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंतचे वय गृहीत धरले जाणार आहे. पारंपारिक एकल, कलात्मक एकल व दुहेरी तसेच तालात्मक दुहेरी या योगासनांच्या चार प्रकारात ही स्पर्धा होणार असून स्पर्धकांना दोन स्पर्धा प्रकारात सहभागी होता येईल. विजयी होणार्‍या खेळाडूंचा संघ राज्यपातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर, राज्य पातळीवरील स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवण्याचीही संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.

पर्धेबाबत अधिक माहितीसाठी उमेश झोटिंग (9823138856) व कुलदीप कागडे (9527320109) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 504
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

June 22, 2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

April 22, 2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

March 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली:  जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.