Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपच्या सत्तेचे लाचार भोई!
विश्लेषण

भाजपच्या सत्तेचे लाचार भोई!

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक व मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2023No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

रविवार विशेष / प्रवीण पुरो

महाराष्ट्रातील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवारी सार्‍या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, जवळपास सर्वांनीच तो ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. माणून नावाचा प्राणी किती निष्ठूर असतो, तो कसाही विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनही मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठी आजवर माणसं फोडली जायची. आता थेट पक्षच फोडायचा आणि सत्ता काबीज करायची पध्दत फडणवीसांनी अंगिकारली आहे. आधी शिवसेना फोडली. आता राष्ट्रावादीच्या मालकीवर दावा सुरू आहे. भाजपच्या ढासळत्या राज्य सत्तेची जुळवाजुळव दुसर्‍या पक्षांची घरं फोडून होईल, असा भाबडा विश्‍वास फडणवीसांचा आहे. 

2024 ला केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या राज्यात फडणवीसांनी लुटारूगिरीचा मार्ग अनुसरला आहे. गेल्या काही काळातील राज्यातील राजकीय चित्र लक्षात घेता महाराष्ट्रातील राजकरणाच्या दुर्देवाचे फेरे फडणवीसांच्या नावे नोंदले जातील, यात आता संदेह नाही. आजवर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून गणलं जात होतं. ते इतिहास जमा झालं. कधीकाळी ते पुरोगामी होतं, असं म्हणायची वेळ आलीय. आता ते इतिहासजमा झालं आहे. राजकरणाचा इतका विचका देशात कधीच झाला नव्हता. महाराष्ट्राचं हे पुरोगामित्व या एका माणसाने विक्रीला काढलंय आणि त्याला कोणीही आवरू शकत नाही. कारण तो निष्ठूर आणि कपटी आहे. तो कशाचाही आसरा घेऊ शकतो. आणि समोरच्याला आत टाकू शकतो.

शिवसेनेचे आमदार फडणवीसांच्या सत्तेला भाळले तेव्हा त्यांनी अनेक निमित्त केली. कोण अजित पवारांच्या नावे निधीचं निमित्त करत होतं, तर कोणी उध्दव ठाकरे घरात बसल्याचं कारण सांगत होतं. काही हिंदुत्वाच्या नावाने फुशारक्या मारत होते. तर काहीजण कामच होत नसल्याची नकारघंटा वाजवत होते. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निमित्ताला कारणं शोधलीच आहेत. शिंदेंचे आमदार तसे नवखे होते. हे राजकारण त्यांच्या अंगवळणी पडत नव्हतं. ते पडद्याआडचे कलाकार असल्याने स्क्रीप्ट येईल ती वाचण्याचं काम ते करत होते.

राष्ट्रवादीच्या या म्होरक्यांचं तसं नव्हतं. हे म्होरके पुरते बनेल आणि पोहोचलेले आहेत. ते होत्याचं नव्हतं सहज करू शकतात. आपल्या बंडाला ते कोणतीही कारणं देऊ शकतात. त्यांना म्हणे विठ्ठलाला भेटू दिलं जात नव्हतं. विठ्ठलाचा भोवताल बडव्यांनी व्यापल्याची त्यांची तक्रार होती. काहीजण पवारांनी सल्ले देण्यापुरतं उरावं असं म्हणत होते. सत्तेत जाण्याचे मार्ग म्हणे पवार यांनी रोखून धरले होते. परळीचे मुंडे तर स्वत:ला पक्क्या गुरूचे चेले समजू लागले होते. रुपाली चाकणकरांच्या शब्दाला पक्षातून फुटून बाहेर पडल्यावर धार चढली आहे. भुजबळ तर नटसम्राट. काहीही फेकलं तरी लोकं मानतील, असा त्यांचा समज झाला आहे. सारं गंगेला मिळालं असताना ते विठ्ठलाचा धावा करू लागले आहेत. आपल्यावरच्या कारवाया रोखणं आणि आपसूक सत्तेत जाऊन बसणं इतकाच या मंडळींचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम यथायोग्य पार पाडावा म्हणून ही माणसं आज उघड खोटं बोलत आहेत.

छगन भुजबळांची रवानगी ज्या भाजपने तुरुंगात केली त्या भाजपच्या ते आडोशालाही जाणार नाहीत, असं वाटत असताना ते आता भाजपऐवजी पवारांनाच प्रश्‍न विचारत आहेत. पवार माझे विठ्ठल आहेत, असं सांगणार्‍या या भुजबळांमागे पवार खरोखरच विठ्ठलाच्या रुपाने उभे होते. उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये कोणाला पाठवावं यावरून सुरू असलेला खल पवारांनी एका शब्दात निकालात काढला. तुरुंगात जाऊन आलेल्या भुजबळांच्या नावे अजित पवारांपासून तटकरे, पटेलांची फुली होती. तुरुंगातून बाहेर आलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी बसवल्यास महाविकास आघाडीची सुरुवातीलाच नकारात्मक होईल, अशी या मंडळींची तक्रार होती. या तक्रारींकडे पार दुर्लक्ष करत पवारांनी पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये भुजबळांची वर्णी लावली. तरीही विठ्ठल पावला नाही, असं भुजबळ म्हणतात याचा अर्थ काय काढावा? पक्षामध्ये आपला अपमान झाल्याची तक्रार भुजबळ आता करत आहेत. खरं तर भुजबळांइतकं पुनर्वसन राष्ट्रवादीत एकाही व्यक्तीचं झालं नाही. वयानुसार भुजबळ यांना विसराळूपणा आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निलाजर्‍या नेत्यांमध्ये आणखी एका नेत्याचा समावेश आहे. हा नेता म्हणजे भंडार्‍याचे प्रफुल्ल पटेल. या पटेलांच्या अवकातीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका शब्दात मोजणी केली. पटेल हा अवसानघातकी आणि पाठीत खंजिर खुपसणारा माणूस असल्याचं नाना म्हणाले. ते अगदीच गैर होतं असं नाही, हे आता लक्षात येतं. केंद्रात ते ज्या-ज्या ठिकाणी मंत्री होते तिथे भ्रष्ट कारभार केल्याच्या असंख्य तक्रारी भाजपने त्यांच्या विरोधात केल्या आणि लावूनही धरल्या. विमानोड्डाण मंत्री असताना त्यांच्या नावाने भ्रष्टाचाराची जंत्री भाजपने जमवली होतीच. वरळीच्या सी. जे. हाऊसमधल्या चार मजल्यांच्या खरेदीच्या प्रकरणात भाजपने त्यांची पिसं उपटली होती. या मजल्यांवर ईडीने टाच आणली आणि त्याचा जाब देण्याचं फर्मान पटेलांवर बजावलं. दाऊदचा साथीदार असलेल्या इक्बाल मिर्चीच्या पत्नीबरोबरील आर्थिक व्यवहारातील चौकशीचे फेरे भाजपने पटेलांच्या मागे लावले. जागतिक फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष या नात्याने क्रिडा संहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका पटेल यांच्यावर ठेवला होता.

इंडियन एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष सुनील अरोरा यांनी एअर इंडियाच्या बरबादीस प्रफुल्ल पटेल कारण असल्याचा गंभीर आरोप केला होता. पटेल हे विमानोड्डाणमंत्री असताना जेट विमानं खरीदण्याचा निर्णय हा केवळ कमाईच्या उद्देशाने आणि एका कंपनीच्या फायद्यासाठी त्यांनी घेतल्याचा गंभीर आरोप अरोरा यांनी केला होता. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे धागेदोरे भाजपने ईडीकडे पोहोचवले. ते पटेलांच्या भोवती पिंगा घालत आहेत.

पवारांचा हात धरून आपल्या मुलीचा राजकीय विकास करणार्‍या सुनील तटकरेंबाबत काय बोलावं तेच कळत नाही. ज्यांना ते गुरू समजतात त्यांच्याच पाठीत तटकरे खंजिर खुपसतात, हा त्यांचा इतिहास आहे. पडत्या काळात त्यांनी अंतुलेंच्या पाठीत वार केले होते. कुठलाही विचार न करता पवारांनी त्यांना आसरा दिला. त्यांनी राष्ट्रवादीला आपला रखेल पक्ष बनवून टाकलं. त्यांनी बंधू अनील यांना विधान परिषदेवर, पुतण्या अवधूत याला विधानसभेवर आणि मुलगी आदितीला मंत्री करून टाकलं. ज्या मुलीला राजकारणातला ओ की ठो कळत नव्हतं तिला राज्यमंत्री करून घेतलं. तिथे त्यांना प्रशांत पाटील, राजवाडे, निकम दिसले नाहीत. रायगड जिल्ह्यातील कोंडाणे आणि बाळगंगा या प्रकल्पांच्या उभारणीकामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तटकरे यांच्यावर आरोपपत्रही दाखल केलं तेही भाजपच्या आग्रहाखातर. अटी आणि शर्तींना गुंडाळून बोगस निविदाकार उभे करून तटकरे यांनी सुमारे 80 कोटी रुपयांची कामं चक्क 614 कोटीला बहाल केल्याचा गंभीर आरोप तेव्हा किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाचीही ईडीकरवी चौकशी सुरू आहे. सहा अधिकार्‍यांविरोधी गुन्हे दाखल झाले तेव्हापासून तटकरेंचा कल भाजप प्रवेशाचा होता.

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर होतीच. याच कारणास्तव मार्च 2022 मध्ये ईडीने अजित पवार यांच्या घरावर छापेमारी केली होती. काही संपत्तीवर टाचही आणण्यात आली होती. पवार यांच्या जरंडेश्‍वर साखर कारखान्यावरही जप्तीची कारवाई करण्यात आली. या सार्‍या कारवाया ही अजित पवारांसाठी भाजपची देण होती. पुढे विदर्भ सिंचन घोटाळ्यात ईडीने मे 2020 मध्ये रितसर चौकशी सुरू केली. पार्थ पवार यांच्या कंपनीवर छापेमारी झाली. राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यातही अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचं नाव भाजपने गोवलं.

कोल्हापुरचे हसन मुश्रिफ यांच्यावरील आरोपांसाठी त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर भाजपने ईडीची छापेमारी करायला लावली. कागलचा सर सेनापती साखर कारखाना, अप्पासाहेब नलावडे या गडहिंग्लज येथील सारखर कारखान्यातील कथित घोटाळ्याच्या चौकशीत ईडीने मुश्रिफांच्या घरावर, कार्यालय आणि कारखान्यांवर धाडी टाकून त्यांना हैराण करून सोडलं. भाजपचे सोमय्या यामागे होते. या सर्वांवरील आरोप खरे की खोटे हे आरोप करणारे भाजपचे नेतेच सांगू शकतील. पण त्याआधीच त्यांनी आपलं इमान विकलं. ते सगळे आरोप करणार्‍या भाजपच्या आणि फडणवीसांच्या वळचळणीला जाऊन शरद पवार यांनाच दोष देत असतील तर त्यांना आपला चेहरा आरशात पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. आता पवारांवर आरोप करून त्यांना स्वत:ला सिध्द करून दाखवता येणार नाही. भाजपच्या सत्तेचे लाचार भोई गणावं, इतका दोष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 561
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.