Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक रुपयात पीक विम्याचा लाभ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शेती व सहकार

एक रुपयात पीक विम्याचा लाभ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कृषी योजना प्रचार रथाचे उद्घाटन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे‌. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्‍ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्‍यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

राज्‍य शासनाने खरीप व रब्‍बी हंगामाकरीता सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्‍यासाठी हे रथ जिल्‍ह्यामध्‍ये रवाना करण्‍यात आले.

याप्रसंगी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, मच्छिंद्र थेटे, दिपक पठारे, सतिष कानवडे, अशोकराव धावणे यांच्‍यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.

महसूलमंत्री विखे म्‍हणाले, यापूर्वी पीक विमा योजनेचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला. शेतकऱ्यांची आर्थिक लुट आणि फसवणूक झाली. या परिस्थितीमध्‍ये बदल करण्‍यासाठी राज्‍य सरकारने शेतकऱ्यांकरीता एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. त्‍याची अंमलबजावणी आता यंदाच्‍या खरीप हंगामापासून सुरु होत आहे. या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतक-यांवर पडणार नाही. शासनच आता विम्‍याची रक्‍कम भरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

या योजनेत सहभाग घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी स्‍वत:हून आता पुढे आले पाहिजे. हवामानातील बदल हे कृषी क्षेत्रापुढे मोठे आव्‍हान असल्‍याने आपल्‍या पीक उत्‍पादनाची सुरक्षितता वाढविण्‍यासाठी विमा योजनेचे संरक्षण कवच महत्‍वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयांमध्‍ये संपर्क साधून या योजनेची माहिती घ्‍यावी. जिल्‍ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जावून या योजनेचा प्रसार आणि प्रचार करुन, योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी केल्‍या.

जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेण्‍यासाठी ३१ जूलै २०२३ ही अंतीम तारीख असून शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल करण्‍यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्‍ये सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली असून, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही संपर्क साधून योजनेत सहभाग घेण्‍याचे आवाहन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 576
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका…

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.