Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडिलांच्या स्मृती निमित्ताने स्वामी विवेकानंद वाचनालयास ग्रंथ भेट
सामाजिक

वडिलांच्या स्मृती निमित्ताने स्वामी विवेकानंद वाचनालयास ग्रंथ भेट

गावोगावी ग्रंथ मंदिरे उभे राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती : प्रीतम देशमुख
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 10, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले.

स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात अडकलेल्या तरुण पिढीला दिशा देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता आहे. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. ही वाचन संस्कृती जोपासले जावी, यासाठी स्वामी विवेकानंद वाचनालयाने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.

दिलीप कदम म्हणाले, एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. नातवंडांना गोष्टी सांगणारे, त्यांच्यावर संस्कार करणारे आजी-आजोबा आता दिसत नसल्याने या लहान मुलांचे बालपण हरवले आहे. आजच्या डिजिटल युगात ही मुले मोबाईल गेमच्या आहारी जात असताना या पार्श्वभूमीवर लहान मुलांवर सुयोग्य संस्कार घडविणारी पुस्तके त्यांना या ग्रंथ देणगीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाले यांनी केले तर आभार ग्रंथपाल उज्वला महाले यांनी मानले. यावेळी भाऊसाहेब गोसावी, हिरालाल सुर्वे, डॉ. अरुण कडलग, सुखदेव मोहिते, शरद कदम आदी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 586
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.