Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जीएसटीची नोटीस बघून बेरोजगार तरुणाला बसला धक्का… नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या! पॅन, आधार कार्डचा करा जपून वापर
प्रशासन

जीएसटीची नोटीस बघून बेरोजगार तरुणाला बसला धक्का… नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या! पॅन, आधार कार्डचा करा जपून वापर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

आपल्या नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या असल्याचा धक्का बावीस वर्षे वयाच्या एका बेरोजगार तरुणाला जीएसटीच्या आलेल्या 24 लाख 61 हजार रुपयांच्या बिलाच्या नोटीसमुळे बसला आहे.

त्यामुळे धक्का बसलेल्या या तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा पोलिसांपुढे मांडली. पोलिसांनी देखील या बेरोजगार तरुणाच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील बुलंद शहरातील रहिवासी असलेल्या देवेंद्र कुमारला 24 लाख 61 हजार रुपयांच्या थकीत जीएसटी बिलाची नोटीस आली. बांधकाम मजूर असलेल्या देवेंद्र कुमारला या नोटीसमुळे चांगलाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या देवेंद्र कुमारच्या नावावर एक कोटी छत्तीस लाख रुपये उलाढाल असणारी कंपनी आहे, असा खुलासा त्याला या नोटीसमधून झाला आहे. या पाठोपाठ त्याला दुसरी आणखी एक नोटीस मिळाली असून त्यात त्याच्या नावावर असलेल्या कंपनीची एक कोटी सोळा लाख रुपयांची उलाढाल असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बेरोजगार असलेला देवेंद्र कुमार या नोटीसमुळे मात्र तब्बल दोन कंपन्यांचा मालक असल्याचे दिसते.

देवेंद्र कुमारच्या मते दोन वर्षांपूर्वी तो नोएडाच्या पॅकिंग कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. कंपनीच्या कंत्राटदारान त्याचं पॅन आणि आधार कार्ड पगारासाठी घेतलं होतं. त्याच्याच आधारावर त्या कंपनीतील लोकांनी कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कंपनी उभी केली असावी, असं देवेंद्र कुमारचे म्हणणं आहे.

कागदपत्राचा गैरवापर केल्याचा संशय देवेंद्र कुमारला असून गरीब असलेला देवेंद्र कुमार हा एका गृहनिर्माण प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता. त्याला दिवसाकाठी तीनशे रुपये पगार मिळायचा पण आता ते काम देखील त्याच्याकडे नाही. अशा स्थितीत देवेंद्र कुमार एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 743
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.