Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘या’ शिबिरात 327 रक्तदात्यांनी केले रक्तदान; रक्तदात्यांना मिळाले एक लाखाचे विमा संरक्षण आणि छत्री
आरोग्य

‘या’ शिबिरात 327 रक्तदात्यांनी केले रक्तदान; रक्तदात्यांना मिळाले एक लाखाचे विमा संरक्षण आणि छत्री

महिलांनी मोठ्या संख्येने केले रक्तदान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – रोटरी क्लबसह विविध संस्थांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकाच वेळी 327 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना एक लाखाचे अपघाती विमा संरक्षण आणि छत्री भेट देण्यात आली.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेत रोटरी क्लब, टीएलसी ग्रुप, इनरव्हील क्लब, संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, निमा, आयएमए, आयडीए, आयएचएमए आदी संस्थांनी शुक्रवारी (7 जुलै) आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते औद्योगिक वसाहतीमध्ये तर जागतिक स्तरावर संगमनेरचे नाव उंचावणाऱ्या सायकलपट्टू प्रणिता सोमन हिच्या हस्ते रोटरी नेत्र रुग्णालयात करण्यात आले. रक्तदात्यांमध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने समावेश होता. संगमनेर औद्योगिक वसाहत, रोटरी नेत्र रुग्णालय आणि वर्मा आर्ट्स अशा तीन ठिकाणी एकाच वेळी हे शिबिर घेण्यात आले. अर्पण ब्लड बँक व आधार ब्लड बँक यांनी या प्रकल्पासाठी मदत केली.

रो. रवींद्र पवार यांच्यातर्फे रक्तदात्यांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला तसेच टीएलसी मार्फत पावसाळी छत्री भेट देण्यात आली. रक्तदानाबद्दल समाजात दिवसेंदिवस जागरुकता वाढत आहे. रक्तपेढ्या व विविध हॉस्पिटल यांच्याकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्त संक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. यामुळे रक्तदान शिबीरांचे वेळोवेळी आयोजन करणे खुप महत्त्वाचे ठरते.

शिबिर यशस्वीतेसाठी रोटरी क्लब अध्यक्ष आनंद हासे, सेक्रेटरी मधुसुदन करवा, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन के. के. थोरात, व्हा. चेअरमन राहुल गडगे, इनरव्हीलच्या अध्यक्षा सुनिता गाडे, सेक्रेटरी शिल्पा नावंदर, प्रकल्प प्रमुख डॉ. प्रमोद राजुस्कर, मंजु मणियार, प्रकल्प समन्वयक उद्योजक नितीन हासे, कपिल चांडक, संदीप फटांगरे आदींनी प्रयत्न केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 538
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शिक्षणातील लोकसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत…

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.