Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांचा धक्कादायक मृत्यू, बंद खोलीत आढळला मृतदेह
सामाजिक

सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांचा धक्कादायक मृत्यू, बंद खोलीत आढळला मृतदेह

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2023Updated:15/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे –  आंबी (ता. मावळ) येथे एका बंद खोलीत शुक्रवारी (ता.१४) रात्रीच्या सुमारास मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी (वय ७७) यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. महाजनी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते महाजनी हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.

महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत गेले. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते शालेय जीवनापासून नाटकात, चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करत होते. त्यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी. ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली.

१९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता. सन १९७५ ते १९९० चा काळ रवींद्र महाजनी यांनी गाजवला. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्या काळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट खूप गाजले. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे या सिनेमातील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/mXeGcDSgpT

— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 15, 2023

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 583
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.