Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गिर्यारोहक सुविधा कडलग, रोटरी अध्यक्ष ऋषिकेश मोंढे मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
सामाजिक

गिर्यारोहक सुविधा कडलग, रोटरी अध्यक्ष ऋषिकेश मोंढे मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा “मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२३” लातूरमध्ये वितरित करण्यात आला.

राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे होते. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते .

जवळे कडलग येथील मात्र सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग यांनी ८८४९ मीटर उंच असलेल्या जगातील सर्वोच्च एवरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करून अहमदनगर जिल्ह्याचे नाव उज्वल केले.

तर सामाजिक क्षेत्रात ऋषिकेश मोंढे यांनी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. युवा उद्योजक व रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे हे साई आशीर्वाद इंडस्ट्रीजचे संचालक असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. रोटरी क्लब संगमनेरच्या माध्यमातून त्यांनी कोविड पश्चात पार्श्वभूमीवर संगमनेर अकोले तालुक्यातील ३७ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शालेय अभ्यासक्रम असलेले एक कोटी रुपयाचे ६६५ टॅब वितरित केले आहेत. कोरोना महामारीमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या १११ महिलांना आटा चक्की व ६१ महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे. अंधत्व मुक्त समाज निर्मितीसाठी उपवर गरजू व गरीब मुलामुलींच्या ७१ तिरळेपणा निर्मूलन शस्त्रक्रिया रोटरी आय केअर ट्रस्ट संगमनेरच्या माध्यमातून केल्या आहेत.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी सक्षमपणे उभा राहण्यासाठी नांदूर खंदरमाळ येथे ५०० केशर आंबा, वड, चिंच यांचे तर जवळे कडलग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एक एकर जागेत अधिक उत्पादन देणाऱ्या चिंचेची लागवड करून चिंचबन उभे केले आहे.

कोरोना आपत्तीमुळे विधवा झालेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोंढे यांनी दिलेल्या योगदानाची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 897
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

By अनंत पांगारकरAugust 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील…

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.