Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना ठोठावला पाच हजाराचा दंड… काय आहे प्रकरण
न्यायालय

खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना ठोठावला पाच हजाराचा दंड… काय आहे प्रकरण

दंडाची रक्कम आनंदग्राम संस्थेला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

औरंगाबाद – अतिक्रमणासंदर्भातील एका जनहित याचिकेमध्ये कारवाईचा अहवाल न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले.

अहमदनगरच्या शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी या ग्रामपंचायतीकडे बांधकाम व्यावसायिकांच्या परवान याबाबत माहिती मागितली होती. ग्रामपंचायतीने अनेक बांधकाम व्यावसायिकांना कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती दिली होती, त्यामुळे विनापरवाना अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाईसाठी त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने भिंगारदिवे यांनी औरंगाबाद खंडपीठात 2018 मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि एस. ए. देशमुख यांच्यासमोर या याचिकाची सुनावणी झाली. या संदर्भात त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी प्रतिवादींना न्यायालयाने नोटीसा बजावल्या होत्या. यात ग्रामपंचायतीने आपले म्हणणे सादर केले होते.

या त्यांनी संबंधित बांधकाम परवानगी बाबत कोणते रेकॉर्ड नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सदरची सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने 2023 मध्ये या प्रकरणात लक्ष घालून अतिक्रमणधारकांविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बजावले होते. तसेच कारवाईनंतर चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही प्रतिज्ञापत्र तसेच अतिक्रमण धारकाविरुद्ध केलेल्या कारवाईचे प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजाराचा दंड केला. तसेच दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्याचा आदेश दिला आहे. कपात करण्यात येणारी रक्कम आनंदग्राम या संस्थेत जमा करण्याची सूचना प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ यांना करण्यात आली आहे.

या जनहित याचिकेमध्ये याचिकाकर्ते भिंगारदिवे यांच्या वतीने ॲड. संदीप आंधळे काम पाहत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 493
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026

३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशी; महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने लागलेला ऐतिहासिक निकाल!

June 29, 2026

संगमनेरमधील फसवणूक प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब कुटे यांना औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर; प्रकृती आणि ७५ लाखांची ठेव लक्षात घेऊन कोर्टाचा निर्णय

June 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली:  जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.