Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल दिनाचे औचित्य साधत महसूल सप्ताह साजरा करणार; महसूल खाते लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतला निर्णय
प्रशासन

महसूल दिनाचे औचित्य साधत महसूल सप्ताह साजरा करणार; महसूल खाते लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतला निर्णय

राज्यात प्रथमच महसूल प्रशासन लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 29, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – “लोकाभिमुख कामांचा करूनी निपटारा, चला करूया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीदवाक्याने महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाणार असून महसूल खात्याशी संबंधित सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भात काल मर्यादेत निपटारा व्हावा, जनतेला दर्जेदार व चांगली सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 1ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक: दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, प्रांताधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला.

विखे म्हणाले, सप्ताहाचे आयोजन केवळ शासकीय स्वरूपाचे न करता या व्यापक अभियानातून अधिकारी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी संवाद कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करावा. विशेष मोहिमेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवितांना गतिमान व लोकाभिमुख प्रशासन करण्याचा संकल्प आहे. अभियानात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

काय कराल: यादरम्यान कार्यालयीन स्वच्छतेपासून विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेले सांस्कृतिक, साहित्यिक आणि सेवाभावी उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. महसूल विभागाने वर्षभर केलेल्या लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी एक ऑगस्टला राज्यात महसूल दिन साजरा केला जातो. यावर्षी मात्र या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विखे म्हणाले.

अभियानाच्या सात दिवसांमध्ये सामान्य नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या अर्जावर काल मर्यादेत निपटारा करून अधिक चांगली दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. कार्यालय आणि परिसर स्वच्छता मोहीम, राईट टू सर्विस कायद्याची अंमलबजावणी, सिक्स बंडल रेकॉर्ड उपक्रम, कार्यालयीन सेवेची कार्यप्रणाली या सप्ताहानिमित्ताने तयार करण्यात यावी. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक दिवस दुर्गम भागात मुक्काम करून गावाचे प्रश्न जाणून घ्यावे. राज्यात प्रथमच सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण प्रशासन लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

असे आहे सप्ताहाचे नियोजन: 1 ऑगस्टला महसूल सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 2 ऑगस्टला ‘युवा संवादा’च्या माध्यमातून महसूल विभाग महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन करेल. 3 ऑगस्टला ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून सामान्य माणसाचे गाव पातळीवर महसूलशी संबंधित प्रश्न जाणून घेतले जातील. 5 ऑगस्ट ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न जाणून घेतले जातील. महसूल विभागातील निवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार तसेच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यातील कवी, साहित्यिक यांच्या साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी सूचना दिल्या.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 476
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

August 4, 2026

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

August 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

By अनंत पांगारकरAugust 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यातील…

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.