Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याने उभारला छतावरील सोलर सिस्टम प्रकल्प; दररोज होणार साडेसातशे किलोवॅट वीज निर्मिती! हे आहेत फायदे…
शेती व सहकार

थोरात कारखान्याने उभारला छतावरील सोलर सिस्टम प्रकल्प; दररोज होणार साडेसातशे किलोवॅट वीज निर्मिती! हे आहेत फायदे…

कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रूफटॉप सोलर उभारणी करणारा राज्यातील पहिला कारखाना

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने छतावरील सोलर सिस्टीम (रूफटॉप) प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाद्वारे दररोज ७५० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. थोरात कारखान्याने अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रकल्प कार्यान्वित करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे राज्यासाठी प्रयोगशील व दिशादर्शक राहिला आहे.

पुण्यातील बैठकीत कार्यकारी संचालकांचा सत्कार : थोरात कारखान्याने अल्प कालावधीत या प्रकल्पाची उभारणी करत प्रकल्प कार्यान्वित केल्याने पुणे येथे को-जन इंडियाच्या बैठकीत राज्य साखर संघाचे चेअरमन व को-जन इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कारखान्याने उभारलेल्या सौर ऊर्जेवरील दिशादर्शक रूफ टॉप सोलर प्रकल्पाबद्दल कारखान्याच्या धुरीनांचे को-जन इंडियाचे संचालक मंडळाच्या बैठकीत कौतुक करण्यात आले.

अशी राहिली कारखान्याची वाटचाल : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करणाऱ्या थोरात सहकारी साखर कारखान्याने काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जपताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही सातत्याने विक्रमी भाव दिला आहे. नव्याने उभारलेल्या 5500 मे. टन क्षमता व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प हा यशस्वीपणे कार्यरत असून तोदेखील साखर कारखानदारीत इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे.

असे आहेत नव्या प्रकल्पाचे फायदे : कारखान्याने छतावरील सोलर सिस्टीमद्वारे 750 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रयोग अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करून नुकताच कार्यान्वित केला. या सोलर सिस्टीममधून एका तासात 750 युनिट म्हणजे सलग दिवसभरातील बारा तासात नऊ हजार युनिट वीज तयार होणार आहे. दररोज तयार होणारी ही विज कारखाना स्वतः वापरणार असून कारखान्याच्या ऑफ सीजन काळात ही वीज ऊर्जा महामंडळाला विकली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीचा 2 कोटी 90 लाख रुपये खर्च अवघ्या अडीच ते तीन वर्षात वसूल होणार आहे.

यांनी केले अभिनंदन : कारखान्याने उभारलेल्या या यशस्वी प्रकल्पाबद्दल, को-जनचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, एकविरा फाउंडेशनच्या प्रमुख कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात, संपत डोंगरे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,111
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.